उपखेडला ३१ कुंडी यज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:07 AM2019-09-29T00:07:59+5:302019-09-29T00:08:04+5:30
जनार्दन स्वामी आश्रम । धार्मिक कार्यक्रमांसह कीर्तन महोत्सव
पिलखोड, ता.चाळीसगाव : संत जनार्दन स्वामी यांच्या १०५ व्या जन्मोत्सवानिमिताने (ललित पंचमी) उपखेड येथील आश्रमात २६ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर या दरम्यान ३१ कुंडात्मक शिवशक्ती यज्ञ सोहळा व कीर्तन महोत्सव १००८ महामंडलेश्वर शांतीगीरी महाराज यांच्या उपस्थितीत होत आहे. कीर्तन महोत्सवात ह.भ.प सुनिल जगताप, विश्वनाथ वाडेकर, गोविंद चौधरी, भाऊसाहेब अकोलकर, दिनेश महाराज, तुकाराम महाराज, शिवभाऊ अंगुलगावकर यांचे कीर्तन होईल. ३ आॅक्टोबरला जन्मोत्सव, पालखी सोहळा, यज्ञ पूर्णाहुती, शांतीगिरी महाराजांचे प्रवचन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
आकर्षक मंडप
आश्रमात बोरगवतापासून राजस्थानी करागिरांकडून आकर्षक सुमारे २ लाख खर्चाचा मंडप उभारला आहे. यात ३१ होम हवन कुंडे तयार केली आहेत.