पाल येथे उर्दू शाळेचा स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 06:10 PM2017-09-25T18:10:18+5:302017-09-25T18:14:05+5:30
पाल, ता.रावेर, दि.२५ - येथील ग्रामपचांयत शेजारील उर्र्दू शाळेचा स्लॅब सोमवारी सकाळी १० वाजता कोसळला. सुदैवाने घटनेच्या वेळी या ठिकाणी विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
आॅनलाईन लोकमत
पाल, ता.रावेर, दि.२५ - येथील ग्रामपचांयत शेजारील उर्र्दू शाळेचा स्लॅब सोमवारी सकाळी १० वाजता कोसळला. सुदैवाने घटनेच्या वेळी या ठिकाणी विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
पाल ग्रामपंचायत शेजारील उर्दू शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या ठिकाणी चार ते पाच मजुर कामाला होते. बांधकामासाठी पाणी संपल्याने मजूर स्लॅबच्या खाली उतरले होते. त्यानंतर काही क्षणात हा स्लॅब कोसळला. या इमारतीजवळ जि.प.उर्दू शाळेचे विद्यार्थी नेहमी खेळत असतात. मात्र हे विद्यार्थी उशिरा आल्याने पुढील अनर्थ टळला. ज्या इमारतीचा स्लॅब कोसळला त्याला लागून अंगणवाडी आहे. अंगणवाडी सेविकांचा संप सुरु होता. सोमवारी अंगणवाडी सुरु होऊन आज पहिला दिवस होता. त्यामुळे अल्प प्रमाणात मुले वर्गखोलीत बसले होते. पाल गावातील शाळेच्या खोल्यांची दुर्दशा झाली आहे. जिल्हा परिषद मराठी शाळेचाही स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आहे. जिल्हा प्रशासनाने जीर्ण खोल्यांचे नविन बाधंकाम करुन द्यावे अशी मागणी होत आहे.
पाल येथील जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम बोगस पद्धतीने केल्यामुळे स्लॅब कोसळला आहे. सकाळी दहा वाजता ही घटना घडली. लहान मुले नेहमी या इमारतीजवळ खेळतात. सुदैवाने मुले लवकर आलेले नव्हते, नाही तर मोठा अनर्थ झाला असता.
सत्तार तडवी, ग्रामपंचायत सदस्य, पाल