मालमत्ता सव्रेक्षणासाठी ड्रोनचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2017 12:29 AM2017-01-11T00:29:56+5:302017-01-11T00:29:56+5:30
मालमत्तांची फेरमोजणी केलेली नसल्याने नव्याने झालेली अनेक बांधकामे, वाढीव बांधकामांवर कर आकारणीच झालेली नाही
जळगाव : मनपाने अनेक वर्षापासून मालमत्तांची फेरमोजणी केलेली नसल्याने नव्याने झालेली अनेक बांधकामे, वाढीव बांधकामांवर कर आकारणीच झालेली नाही. त्यामुळे मालमत्तांच्या सव्रेक्षणासाठी मनपाने अमरावतीच्या स्थापत्य कन्सलटन्सीला मक्ता दिला असून, त्यांनी ड्रोनद्वारे मालमत्ता सव्रेक्षण करण्याची तयारी दर्शविली आहे.
मनपा प्रशासनानेही त्यास संमती दिली असून त्यासाठी आवश्यक कायदेशिर परवानगीची पूर्तता केल्यावर या कामास प्रारंभ होणार आहे. घरोघरी जाऊन मालमत्तांचे फोटो काढून नंबर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मक्तेदार संस्थेने आतार्पयत 100 नगरपालिका, मनपांचे मालमत्ता सव्रेक्षणाचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे.