बनावट सही-शिक्क्यांचा वापर,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:56+5:302021-05-29T04:13:56+5:30

बोदवड : नगर पंचायतीच्या बनावट शिक्क्यांचा वापर करून शासनाची सव्वा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी आराध्या कन्स्ट्रक्शनचा चालक ...

Use of forged signatures, | बनावट सही-शिक्क्यांचा वापर,

बनावट सही-शिक्क्यांचा वापर,

Next

बोदवड : नगर पंचायतीच्या बनावट शिक्क्यांचा वापर करून शासनाची सव्वा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी आराध्या कन्स्ट्रक्शनचा चालक अमोल शिरपूरकर याच्याविरुद्ध बोदवड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील प्रभाग क्र. सातमधील रहिवासी प्रतिभा अनिल कोकाटे व मितेश अग्रवाल यांना इमारत बांधकामासाठी बँकेकडून कर्ज काढायचे होते. बांधकाम हे शिरपूरकर यांच्याकडे दिले होते. बँकेत हे प्रकरण कर्जमंजुरीसाठी आले असता, त्यावर नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी नव्हती. बँकेने यासाठी नगर पंचायतकडे पत्र दिले. त्यावर महसूल कराची एक लाख २२ हजार रुपयाची रक्कम भरली नसल्याचे आढळून आले. त्यात बनावट सही-शिक्क्यांचा वापर झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर पंचायतीचे बांधकाम अभियंता रितेश बच्छाव यांनी फिर्याद दिली. त्यावरून शिरपूरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Use of forged signatures,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.