लासूर येथील शेतकºयाचा उत्तम नैसर्गिक शेतीचा प्रयोग
By Ram.jadhav | Published: February 7, 2018 05:14 PM2018-02-07T17:14:39+5:302018-02-07T17:30:46+5:30
मनेष पाटील यांनी निर्माण केले इतर शेतकरीवर्गासाठी उदाहरण, अत्यल्प खर्चात उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान
राम जाधव
आॅनलाईन लोकमत दि़ ८ जळगाव - दैनंदिन राबणाºया शेतातच रोज नवनवीन प्रयोग करून नैसर्गिक पद्धतीने अगदी कमी खर्चात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण गावरान वाणांचे उत्पादन घेण्याची किमया लासूर येथील मनेष पाटील या शेतकºयाने गेल्या काही वर्षांपासून साधली आहे़ त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करून कपाशी, तूर, भेंडी, उडीद, मूग, मिरची, गहू, आंबा, चिंच, लिंबू असे अनेक आंतरपीक व बहूपीक पद्धतीचा अवलंब करून शेती विकसित केली आहे़ यातूनच त्यांनी आपल्या नैसर्गिक शेतीचे सूत्र सोशल मीडियाचा योग्य वापर करून देशातील शेतकºयांसमोर मांडण्याचे काम केले आहे़
शेतीवर होत असलेला अवाजवी खर्च व शेती उत्पादनास भेटत असलेल्या तुटपुंज्या भावामुळे शेती परवडत नसल्याने नैसर्गिक शेती करून विषमुक्त अन्न भाजीपाला उत्पादित करावा या उद्देशाने अर्ध्या एकर क्षेत्रावर प्रयोगात्मक शेती करायला लासूर येथील मनेष पाटील यांनी सुरुवात केली़ आणि त्यातील यश-अपयश या अनुभवातून जमीन समृद्धीवर भर देत, सर्वच क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले. यातूनच स्वयंपूर्णतेसाठी देशी व सुधारित रोगकीड प्रतिकारक्षम वाणाचे बियाणे जतन, संवर्धन व संशोधन त्यांनी आपल्याच शेतात सुरू केले़ यातून त्यांच्यातील एक शेतकरी शास्त्रज्ञ समोर आला आहे़
सोशल मीडियाच्या माध्यमातून मनेष पाटील व धरणगावचे गटविकास अधिकारी असलेले विलास सनेर यांनी एकमेकांच्या मदतीने शेतीवर भेटीदरम्यान झालेल्या चर्चेतून अनुभवांची देवाण-घेवाण केली़
पुढे टेलिग्रामवर नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन व्हावे व शेतकºयांच्या अनुभवाचा सर्वांना लाभ व्हावा म्हणून विविध समूह तयार केले़ या समूहामुळे हजारो शेतकरी संपर्कात आले़ विषमुक्त, आरोग्यदायी अन्न उपलब्ध व्हावे म्हणून अनेक ग्राहकही जुळत गेले़ यामुळे शेतीमाल व प्रक्रिया केलेला माल विक्रीचे व्यवस्थापन सोपे झाले़ यातून निव्वळ उत्पन्न वाढण्यास मदत झाली. येथे महाराष्ट्रातील शेतकºयांचे, जिल्हा व तालुकावार शेतकºयांचे समूह तयार केले आहेत. तर काही समूह संपूर्ण भारतातील शेतकºयांचे आहेत. तसेच व्हॉट्सअॅप, फेसबुकचाही प्रभावीपणे वापर सुरू केलेला आहे़
टेलिग्रामच्या माध्यमातून दिगंबर खोजे, रवी शर्मा, औरंगाबाद, महेश शंकरपल्ली, सिल्लोड, जावेद इनामदार, श्रीरामपूर, दत्तात्रय परिहार, लातूर, अप्पू रायप्पा पाटील या मार्गदर्शक शेतकºयांचा समूहाला लाभ होत आहे़
जगभरातील नैसर्गिक शेतीतज्ज्ञांचे साहित्य उपलब्ध झाल्याने समूहातील शेतकºयांना लाभ होऊन शेतावर उपलब्ध वनस्पती फळे यापासून अनेक विविध कीटक प्रतिबंधक औषधे तयार करून व गायीचे शेण, गोमूत्र, दूध, ताक वापरून नैसर्गिक शेती कमीत कमी खर्चात करू लागले.
तसेच नॅशनल रिसर्च सेंटर आॅफ आॅरगॅनिक फार्मिंग गाझियाबादचे डॉ़ कृष्ण चंद्रा यांचे संशोधित डिकंपोजर नैसर्गिक शेतीत उपयुक्त सिद्ध झाल्याने त्याचा वापर व उपलब्धतेसाठी समूहाने प्रयत्न केले.
यात नैसर्गिक शेती, गोपालन व संवर्धन, शेळीपालन, कुक्कुटपालन असे समूह असून नैसर्गिक शेती व आपल्या जीवन पद्धतीत मानवी भूमिका म्हणून आत्मानुभूती/ निसर्गानुभूती हा आध्यात्मिक समूह तयार करण्यात आला आहे .
पुढे भविष्यात पशुपालन संवर्धन व संशोधन म्हणून गोशाळा निर्माण करायची असून त्यावर प्रक्रिया उद्योग + नैसर्गिक शेतीला आवश्यक सेंद्रिय प्राणीजन्यखते औषधी तयार करण्याचा मानस असून शेतीपूरक जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन यावरही त्यांना काम करायचे आहे.
पाटील यांच्याकडे एकूण ५ एकर क्षेत्र असून येथे नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते. एक बैलजोडी गीर व कंकराज २ गायी, त्यांच्या ३ कालवडी, २ गोºहे असे ९ गुरांचे पशुधन आहे़ त्यांच्या शेणखत, गोमुत्रापासून घनजिवामृत, जिवामृत, डिकंपोजरपासून तयार केलेले खत यांचा वापर शेतीत होतो. तसेच दूध, ताक, गोमूत्र फवारणी केली जाते. अडीच एकर क्षेत्रात मे महिन्यात ठिबक टाकून तूर लावली. जूनमध्ये आंबा व लिंबू बाग नैसर्गिक पद्धतीने विनामशागत जागेवर गावरान आंब्याच्या कोया व लिंबूच्या बिया टाकून उतरवून घेतल्या. जागेवर उतरवून घेतल्याने यांची सोटमुळे थेट जमिनीत भूगर्भातील पाण्यापर्यंत जातील व पहिली ४ ते ५ वर्षच पाण्याची आवश्यकता असेल. पुढे वरून पाणी देण्याची गरज या झाडांना नसणार. जंगलातील झाडाप्रमाणे नैसर्गिकरीत्या पावसाच्या पाण्यावर ऋतूनुसार आंबे येतील.
ही झाडे एक वर्षाची झाल्यावर त्यांच्यावर केशर, लंगडा व आणखी काही जातींचे कलम करणार आहेत़ १५ बाय १५ फुटांवर ही घनलागवड करण्यात आली आहे. उपलब्ध जागेतून उत्पन्न जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न आहे़ तसेच प्रक्रिया करण्याचा पण मानस आहे. आंबा व लिंबू यांना संरक्षण नैसर्गिक ग्रीन हाऊस सहजीवन म्हणून बहुवार्षिक तूर लावली आहे व आंतरपीक म्हणून मूग पेरला होता.
आंबा व लिंबू यांचे उत्पन्न पाचव्या वर्षी येईल. तोपर्यंत या क्षेत्रातून बहुवार्षिक तुरीचे उत्पन्न येईल. तूर कापणी नंतर मधल्या पट्ट्यात वांगे लागवड व तुरीच्या खुंट्यांवर वेलवर्गीय फळभाज्यांची लागवड उन्हाळ्यात करतात़ देशी पपईची लागवडही ते करणार आहेत़ पुढील पाच वर्षे असेच वेगवेगळ्या भाजीपाला व तुरीचे उत्पादन घेणार आहेत़ पाटील यांनी अनेक भाजीपाला वाणांचे बियाणे संवर्धन केले़ गावरान तुरीतून निवड पद्धतीने लवकर १८० दिवसात तयार होणारे व रोगकीडला प्रतिकारक्षम असलेले तुरीचे वाण पाटील यांनी तयार केले आहे़ हे वाण कोरडवाहू व बागायती दोन्ही पद्धतीने चांगले उत्पादन देते़
(क्रमश:)