मृतदेह जाळण्यासाठी रॉकेलअभावी पेट्रोलचा करावा लागतोय वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 04:27 PM2018-12-14T16:27:15+5:302018-12-14T16:30:11+5:30
रॉकेलमुक्त जिल्ह्याची घोषणा झाली. त्यामुळे रॉकेल कोटा शून्य झाला. मात्र ग्रामीण भागात मृत व्यक्तीचे प्रेत जाळण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने महागडे पेट्रोल आणावे लागते अशी वाईट अवस्था झाल्याचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी सांगितले.
पारोळा- रॉकेलमुक्त जिल्ह्याची घोषणा झाली. त्यामुळे रॉकेल कोटा शून्य झाला. मात्र ग्रामीण भागात मृत व्यक्तीचे प्रेत जाळण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने महागडे पेट्रोल आणावे लागते अशी वाईट अवस्था झाल्याचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी सांगितले.
पारोळा तहसील कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला १ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य वाटपा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यशवंत पाटील दिलीप पाटील, संजय बागडे कैलास पाटील, मुरलीधर पाटील, आधार माळी, भय्या पाटील, योगेश रोकडे, शशी पवार, राजेंद्र विसावे, काळू पाटील, डी.के . पाटील, प्र तहसीलदार पंकज पाटील, नायब तहसीलदार एन.झेड. वंजारी, पुरवठा अधिकारी अनिल पाटील अव्वल कारकून विठ्ठल वारकर आदी जण उपस्थित होते
यावेळी करंजी बु ता.पारोळा येथील भय्या सुरेश महाजन या शेतकºयाने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांचे वारस पत्नी सुरेखा महाजन यांना एक लाख रुपयांचा धनादेश आमदार डॉ सतीश पाटील यांच्या हस्ते दिला.
रेशन तथा संजय गांधी योजनेची बैठक घेऊन लाभार्थी लाभ मिळवून द्या अशा सूचना त्यांनी केली.