पीएम केअरच्या व्हेंटिलेटरचा शासकीय यंत्रणेत वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:44+5:302021-05-25T04:18:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मध्यंतरी अशा रुग्णांची फरफट झाली ...

Use of PM Care's ventilator in government system | पीएम केअरच्या व्हेंटिलेटरचा शासकीय यंत्रणेत वापर

पीएम केअरच्या व्हेंटिलेटरचा शासकीय यंत्रणेत वापर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मध्यंतरी अशा रुग्णांची फरफट झाली होती. मात्र, आता रुग्णसंख्या घटल्याने पुरेशा प्रमाणात वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध होत असल्याने शिवाय वेळेवर उपचार मिळत असल्याने मृत्युदर घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. पीएम केअरकडून गेल्या दोन वर्षांत जिल्ह्याला सुमारे दीडशेपेक्षा अधिक व्हेंटिलेटर्स मिळाली असून, यातील काही व्हेंटिलेटर वगळता सर्व व्हेंटिलेटर हे शासकीय यंत्रणेत वापरली जात आहेत. यातील सात बंदावस्थेत आहेत.

जिल्हा रुग्णालयात वर्षानुवर्षे केवळ सहा व्हेंटिलेटरवर एक आपत्कालीन कक्ष सुरू होता. मात्र, कोरोनाच्या काळात टप्प्याटप्प्याने व अन्य शासकीय यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध झाले. साधारण शंभरच्या आसपास व्हेंटिलेटर विविध माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाला प्राप्त झाले होते. यात पीएम केअर फंडातून आलेल्या व्हेंटिलेटरचा समावेश होता. मात्र, बरेच दिवस कॉनेक्टरअभावी अनेक दिवस एका खोलीत बंद अवस्थेत होते. त्यानंतर काही कालांतराने ते सुरू करण्यात आले होते.

पीएम केअर फंडातून नुकतेच सुरुवातीला ५० व्हेंटिलेटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्राप्त झाले होते. त्यातील सुरुवातीला दहा व्हेंटिलेटरचे इन्स्टॉलेशन व डेमो घेण्यात आला. ते विविध कक्षात लावण्यात आल्यानंतर ४० व्हेंटिलेटरचे इन्स्टाॅलेशन झाल्यानंतर नुकतेच ते विविध कक्षांमध्ये पाठविण्यात आले आहे. हे व्हेंटिलेटर सुस्थितीत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. व्हेंटिलेटरबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच व्हेंटिलेटरची उपलब्धता व कोणत्या रुग्णाला व्हेंटिलेटर लागणार आहे, याची चाचपणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती यावर नियंत्रण ठेवून आहे.

ग्रामीण भागात दिलासा

कोरोनाच्या आधीच्या काळात ग्रामीण यंत्रणेत व्हेंटिलेटरची व्यवस्था नव्हती; मात्र आता प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात एक किंवा दोन व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार मिळत आहेत. सुरुवातीला मात्र व्हेंटिलेटर असूनही ते वापरणारे डॉक्टर नसल्याने यांचा उपयोग होत नव्हता, काही ठिकाणी आताही थोड्याफार प्रमाणात अशी परिस्थिती असल्याने रुग्णांना थेट जिल्हा रुग्णालात पाठविण्यात येत असते.

ग्रामीण यंत्रणेसाठी आलेले व्हेंटिलेटर : ६०

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला या वर्षी आलेले व्हेंटिलेटर ५०

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाल अधिग्रहित केल्यानंतर त्यांना दिलेले व्हेंटिलेटर २७

बंदावस्थेत ७

Web Title: Use of PM Care's ventilator in government system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.