स्वातंत्र्यवीरांनी मातृभूमीच्या संपन्नतेसाठी केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आज वैयक्तिक स्वार्थासाठी होतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:56 PM2018-12-12T23:56:32+5:302018-12-12T23:58:09+5:30

रावेर , जि.जळगाव : तंत्रज्ञानामुळे नात्यातील ओलावा कमी करून कोरडवाहू नाते तयार झाल्याची शोकांतिका असून, संवेदनशीलता व माणुसकी उरली ...

The use of technology for the enrichment of motherland by Swatantraveer is being done for personal self-sacrifice today | स्वातंत्र्यवीरांनी मातृभूमीच्या संपन्नतेसाठी केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आज वैयक्तिक स्वार्थासाठी होतोय

स्वातंत्र्यवीरांनी मातृभूमीच्या संपन्नतेसाठी केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आज वैयक्तिक स्वार्थासाठी होतोय

Next
ठळक मुद्देरावेर : रंगपंचमी व्याख्यानमालेत विख्यात व्याख्याते राहुल सोलापूरकरपाच दिवसीय रंगपंचमी व्याख्यानमालेचा यशस्वी समारोप

रावेर, जि.जळगाव : तंत्रज्ञानामुळे नात्यातील ओलावा कमी करून कोरडवाहू नाते तयार झाल्याची शोकांतिका असून, संवेदनशीलता व माणुसकी उरली नाही. कारण तंत्रज्ञानातील प्रगतीचा आपण चुकीचा अर्थ घेतल्याने तरूणांसमोर ध्येय नाही. त्यास आईवडील सर्वस्वी जबाबदार असून आपण आपला इतिहास, परंपरा, विसरलो. म्हणून स्वातंत्र्याचे गाजर उपभोगण्याऐवजी ओरबाडण्याचा प्रयत्न करणारी आजची पिढी मिजास घालणारी असून, विचित्र लोकशाहीतले मेंढरं ठरली आहेत. स्वातंत्र्यवीरांनी ज्या तंत्रज्ञानाचा वापर मातृभूमीला संपन्न करण्यासाठी केला, आपण मात्र तो स्वत:च्या स्वाथार्साठी करीत असल्याने ही भारतभूमी ज्यांच्या प्राणाहुतींच्या अलंकारांनी लाल झाली, त्या स्वातंत्र्यवीरांच्या जाज्वल्य इतिहासाला विसरत असल्याची खंत ुविख्यात व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी स्वातंत्र्यवीरांची दिशा व आजच्या युवकांची दशा या व्याख्यानाचे अंतिम पुष्प गुंफताना व्यक्त केली.
प्रारंभी विश्वस्त दिलीप वैद्य, अध्यक्ष सचिन जाधव व्याख्याते सोलापूरकर, अशोक तोलानी, हेमेंद्र नगरीया, शेंदुर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले.
आपल्या व्याख्यानाचे पुष्प गुंफताना ते म्हणाले, सर्वार्थाने आजच्या युवकांची दशा झाली नाही. तंत्रज्ञानाच्या अधिक वापरामुळे दिशाहीन होत असेल तर त्याला यापूर्वीची पिढी जबाबदार आहे. पुस्तके नाहीत. इडियट बॉक्ससमोर बसले तर काय उपयोग, शाळा महाविद्यालयात इतिहास शिकवला नाही, दाखवला नाही. सनावळी, तहाच्या अटी, महायुुद्ध शिकवली गेलीत. आधीची व नंतरची सनावळी या दरम्यानचा तो इतिहास शिकवला गेला नाही. मूळात स्वातंत्र्याची संकल्पना वेगळीच होती. सुरक्षित पारतंत्र्यात आपण जगत आहेत. जन्मत: आपण नाड कापण्यापर्यंत आपण तेवढेच खरे स्वातंत्र्य असून बाहेरचा श्वावा घेऊन जेंव्हा रडतो तेव्हापासून आपल्यावर एक पाारतंत्र्याची चौकट लादली गेली जात असल्याची पारतंत्र्यात जाणीव होत असते
अल्लुर, सीतारामाराजू, दुर्गाब ाई देशमुख, मतांगानी हजारात नावाचे स्वातंत्र्य सैनिक आपल्याला माहीती नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. स्वधर्म, स्वभाषा, स्वातंत्र्यवसाठी जे लढले त्या सर्वांना स्वातंत्र्य सैनिक मानले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इंग्रजी ही व्यापाराची दुय्यम भाषा. मातृभाषेला मात्र प्रमाण मानले जाते. उगाचच रेटून अन् खेटून इंग्रजी भाषा बोलण्याचा प्रयत्न केला जातो. कुमारी मातांचा मोठा प्रश्न होता. अकाली मातृत्वामुळे चर्चमध्ये नवजात शिशू सोडले जायचे. निराधार पोरांची शाळा म्हणजे कान्व्हेंट स्कूल. मात्र आपण आईवडील असलेले मायबाप निराधारांच्या छत्राखाली शाळेत सोडत असल्याची खंत व्यक्त केली. हल्ली मध्यरात्री रस्त्यावर तलवारीने केक कापून बर्थडे पार्टी साजरी केली जाते. मात्र तलवारीचा वापर असा होईल हे शिवरायांना समजले असते तर त्यांनी तलवार खाली टाकून दिली असती अन्यथा केकसारख्या पचापच शत्रूंंच्या माना कापल्या असत्या.
माणसाच्या वाढीनुसार लागणाऱ्या भाषेला महत्व असते. स्वर, औष्ट, दंत्य, दंताऔष्ट असलेल्या संस्कृत भाषेचा विचार हा कुठल्याही भाषेत नसल्याचा गौरव त्यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्याचे सुराज्य होण्याचे गाजर तुम्हाला का दिसत नाही. याला दोषी ही मागची पिढीच असून, येणारी प्रत्येक पिढी वैज्ञाानिक दृष्ट्या प्रगत आहे म्हणून मागच्या पिढीने अनुभवाने व संस्कार देवून पुढील पिढीकडून तंत्रज्ञान घेणे हा जनरेशन गॅपमधील सुवर्ण मध्य साधण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सगळे तंत्रज्ञान वापरून वाचणारा वेळ सत्कारणी लागतो काय? पुस्तक वाचताय का? असा प्रश्न उपस्थित करून महिलांनी दागिनेऐवजी पुस्तके घेतली तर त्या पुस्तकातून उद्याचे अलंकार घडतील व हे पिढी घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आभार प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांनी मानले.

Web Title: The use of technology for the enrichment of motherland by Swatantraveer is being done for personal self-sacrifice today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.