शिक्षकांना बोर्डाच्या परीक्षेआधी लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:05+5:302021-03-22T04:15:05+5:30
जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपण जळगाव : पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी सामाजिक वनीकरण विभाग व ...
जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपण
जळगाव : पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी सामाजिक वनीकरण विभाग व राष्ट्रीय हरित सेनेतर्फे सावखेडा शिवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी विजय पवार, वन परिक्षेत्र अधिकारी आर. एस. दसरे, वनपाल अनिल साळुंखे, नगरसेविका उषा पाटील, वन अधिकारी डॉ. एस. आय. शेख, सावखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष पाटील, हरित सेनेचे प्रमुख प्रवीण पाटील, सदस्य सुनील वाणी, अक्षय सोनवणे, वनरक्षक के. एस. ढेपले, एस. बी. कुंभारे, वसंत सपकाळे उपस्थित होते.
वीज बिल वसुलीसाठी जनजागृती रॅली
नशिराबाद : महावितरणचे नशिराबाद येथील घरगुती ग्राहकांकडे १ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. या वसुलीसाठी महावितरणतर्फे नशिराबाद येथे गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता मेघशाम सावकारे, साहाय्यक अभियंता पवन वाघुळदे, कनिष्ठ अभियंता अक्षय ढाकणे, माधुरी पाटील यांच्यासह वीज कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
नेहरू चौकात व्यावसायिकांचे अतिक्रमण
जळगाव : शहरातील नेहमी वर्दळीचा परिसर असलेल्या नेहरू चौकात रविवारी पुन्हा विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी रस्त्यालगत दुकाने थाटून अतिक्रमण केल्यामुळे या चौकात दिवसभर वाहतूक कोंडी होत होती. या ठिकाणी रविवारच्या बाजाराला बंदी असतांनाही, व्यावसायिकांनी बिनधास्तपणे दुकाने थाटली होती. महापालिकेचे मात्र कारवाईकडे दुर्लक्ष दिसून आले.
रस्त्यावर साचले पाण्याचे डबके
जळगाव : शनिवारी सायंकाळी शहरात झालेल्या पावसामुळे नवी पेठ, नेहरू चौक, सुभाष चौक व इतर सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाण्याचे डबके साचले होते. रविवारी सकाळी या डबक्यांमुळे पादचारी नागरिकांना व वाहनधारकांना रस्ता ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच या पाण्यामुळे या ठिकाणी डासांचाही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.