विद्यापीठातील १०० कर्मचाऱ्यांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:37+5:302021-07-08T04:12:37+5:30
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व फिरते लसीकरण केंद्र, जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील ...
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व फिरते लसीकरण केंद्र, जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी, दैनिक वेतनिक आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर बुधवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. विद्यापीठातील तब्बल १०० कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.
यावेळी प्रभारी प्र. कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस. आर. गोहिल, प्रा. के. एफ. पवार, ए. सी. मनोरे, आर. आय. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील, प्रशांत पाटील, आरोग्य कर्मचारी प्रीती निकम, कविता पाटील, सरला सपकाळे आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठातील १०० कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.
लसीचा पुरवठा करावा...
शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, अरुण सपकाळे, राजू सोनवणे, प्रमोद चव्हाण, दीपक गावित, चंद्रकांत इसे, बाळासाहेब पाटील, बलभीम गिरी, मयूर पाटील, पद्माकर कोठावडे, के. सी. पाटील, मनोज वराडे, मृणालिनी चव्हाण, शेखर बोरसे, इत्यादींनी परिश्रम घेतले. जिल्हा आरोग्य विभागाने अजून लसीचा पुरवठा करावा, अशी अपेक्षा यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. कारण, अद्याप बऱ्याच कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी आहे.