पिंप्राळ्यात पहिल्या दिवशी २२६ नागरिकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:33+5:302021-05-28T04:13:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनापासून नागरिक सुरक्षित रहावे यासाठी प्रशासनाकडून लसीरणावर भर दिला आहे. गुरूवारी शहरातील उपनगर असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनापासून नागरिक सुरक्षित रहावे यासाठी प्रशासनाकडून लसीरणावर भर दिला आहे. गुरूवारी शहरातील उपनगर असलेल्या पिंप्राळामधील मनपा शाळा क्रमांक ४८ (निमडी शाळा) येथे लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी २२६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
सकाळी १० वाजता पिंप्राळा येथे महापौर जयश्री महाजन यांच्या उपस्थितीत ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. सुरूवातीला नागरिकांना टोकन देण्यात आले. नंतर नोंदणी करून लसीकरण केले गेले. याप्रसंगी केंद्रावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आमदार सुरेश भोळे, नगरसेविका प्रतिभा कापसे, शोभा बारी, सुरेश सोनवणे, विजय पाटील, शफी भाई, मयूर कापसे, अतुल बारी आदी उपस्थित होते. दिवसभरात २२६ नागरिकांचे या केंद्रावर लसीकरण करण्यात आले. शुक्रवारी देखील या केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे स्थानिकांना याचा फायदा होत आहे. लसीकरणासाठी डॉ.सुषमा चौधरी, स्टाफ नर्स कामिनी इसाळदे, संगीता कोळी, सपना काकड आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, दुपारी सीएमओ राम रावलानी यांनी देखील केंद्राला भेट देवून पाहणी केली.
==============
कुसूंबा येथील लसीकरणाल सुरूवात
कुसूंबा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी गेल्या दोन महिन्यापासून तालुका काँग्रेसचे प्रमोद घुगे यांनी केली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून गुरूवारपासून कुसूंबा येथे लसीकरणाला सुरूवात झाली. ४५ वर्षावरील ४० नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
लसीकरणासाठी राहुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, चेतन अग्निहोत्री, आरोग्य सेविका राजश्री वाणी, आरोग्य सेवक, पंकज तायडे, गटप्रवर्तक सुरेखा साळुंके, आशा सेविका माया पाटील, शैलेश साळुंके आदींनी परिश्रम घेतले.