४ लाख १४ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:26+5:302021-05-13T04:16:26+5:30
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात आतापर्यंत ३ लाख १७ हजार ३२७ ...
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात आतापर्यंत ३ लाख १७ हजार ३२७ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस आणि ९६ हजार ६१६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अशा एकूण ४ लाख १३ हजार ९४३ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.
जिल्ह्यात १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. नंतर टप्प्याटप्याने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठीचे लसीकरण सुरू करण्यात आले.
जिल्ह्यात १६७ लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १७ हजार ३२७ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर ९६ हजार ६१६ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यापैकी सर्वाधिक १ लाख १२ हजार ९४८ नागरिकांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे तर ३९ हजार ८९६ नागरीकांचे लसीकरण प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयामार्फत करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी दिली.