जळगाव जिल्ह्यात चार लाख ९१ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:18 AM2021-05-27T04:18:27+5:302021-05-27T04:18:27+5:30
गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रे सातत्याने बंद राहत आहेत. बुधवारी देखील जिल्हाभरातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद होती. आता आज, ...
गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रे सातत्याने बंद राहत आहेत. बुधवारी देखील जिल्हाभरातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद होती. आता आज, गुरुवारी पुन्हा एकदा लसीकरण केंद्र सुरू राहणार आहे. त्यासाठी २० हजार ४०० कोविशिल्ड आणि १२०० कोव्हॅक्सिनचे वितरण जिल्हाभरात करण्यात आले. आता शहरात कोव्हॅक्सिन असलेले एक खासगी लसीकरण केंद्रदेखील सुरू करण्यात आले आहे. तेथे १३०० रुपये प्रति डोस या दराने लस दिली जात आहे.
पात्र नागरिक - ३० लाख ४५ हजार
४५ वर्षांवरील नागरिक -१४ लाख
१८ ते ४५ या वयोगटातील नागरिक - १६ लाख ४५ हजार
लसीकरण
पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या - ३ लाख ७३ हजार ७४०
दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या - १ लाख १४ हजार ६८८
१८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण - २०८७६
४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण - ४७०५५२
खासगी लसीकरण केंद्रे १
खासगी केंद्रात झालेले लसीकरण - ९०४