महापलिकेच्या ८ केंद्रावर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:45+5:302021-07-19T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सोमवारी शहरातील महपालिकेच्या ८ केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. यातील ७ केंद्रांवर कोवशिल्ड तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सोमवारी शहरातील महपालिकेच्या ८ केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. यातील ७ केंद्रांवर कोवशिल्ड तर चेतनदास मेहता केंद्रावर कोव्हॅक्सिन उपलब्ध राहणार आहे. सर्व केंद्रांवर केवळ दुसरा डोस दिला जाणार असून पहिला डोस अद्यापही लॉक असल्याचे सांगण्यात आले आहे.
शहरातील रेडक्रॉस व रोटरी भवन येथील केंद्र बंद राहणार आहे. छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन, शाहिर अमर शेख, काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय, मनपा शाळा पिंप्राळा, कांताई नेत्रालय या ठिकाणी १८ वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड तर नानीबाई रुग्णालयात ४५ वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड तसेच चेतनदास मेहता रुग्णालयात १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन हे केवळ दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.