विद्यापीठातील ८० कर्मचा-यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:48+5:302021-05-28T04:12:48+5:30
दुसरा टप्पा : प्रमाणपत्राचे वाटप लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व फिरते लसीकरण ...
दुसरा टप्पा : प्रमाणपत्राचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व फिरते लसीकरण केंद्र, जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ८० जणांचे लसीकरण करण्यात आले.
विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी, दैनिक वेतनिक आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी कोविडच्या पार्श्वभुमीवर लसीकरणाचा दुसरा टप्पा गुरूवार, २७ मे रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.मोहन पावरा, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी एस.आर.गोहिल आदी उपस्थित होते. प्रा.ई.वायुनंदन यांनी विद्यापीठात होत असलेल्या लसीकरणाबद्दल आनंद व्यक्त केला. लस घेतल्यानंतर विद्यापीठातील कर्मचारी वासुदेव कोळी व निवृत्त कर्मचारी जमाले यांना प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही. पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष बडगुजर, डाटा ऑपरेटर प्रदीप पाटील, आरोग्य कर्मचारी विकास धनगर, हितेश महाजन हे उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर पवार, विद्यापीठ अभियंता आर.आय.पाटील, सुभाष पवार, डॉ. सोमनाथ वडनेरे, अरूण सपकाळे, राजू सोनवणे, एस.बी. पाटील, बाळासाहेब पाटील, शेखर बोरसे, इत्यादींनी परिश्रम घेतले.