८६९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:18 AM2021-02-24T04:18:10+5:302021-02-24T04:18:10+5:30

अर्धवेळ परिचर नियुक्ती जळगाव : काही उपकेंद्रामध्ये अर्धवेळ महिला परिचर म्हणून मंगळवारी नियुक्या देण्यात आल्या आहे. जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर ...

Vaccination of 869 employees | ८६९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण

८६९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण

googlenewsNext

अर्धवेळ परिचर नियुक्ती

जळगाव : काही उपकेंद्रामध्ये अर्धवेळ महिला परिचर म्हणून मंगळवारी नियुक्या देण्यात आल्या आहे. जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर ही यादी अपलोड करण्यात आली आहे. यात कर्मचाऱ्यांना तीन हजार रुपये मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात ही नियुक्ती देण्यात आल्याचे म्हटले आहे.

ते अधिकारी होते बाहेरच

जळगाव : सामान्य प्रशासन विभागातील एक अधिकारी सोमवारी कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली मात्र, हे अधिकारी मुंबईला बैठकीला गेले होते. शिवाय ते आठवडाभरापासून बाहेरच असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जि. प. तील कर्मचाऱ्यांची तपासणी होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळेही कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मार्च अखेरची धावपळ

जळगाव : जिल्हा परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्याची धावपळ सुरू असतानाच आता त्यात कोरेानाचे रुग्ण वाढल्याने पदाधिकाऱ्यांमध्येही काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी याच वेळी कोरोनान थैमान घातला होता. त्यामुळे पूर्ण वर्षभरात कामे खोळंबली होती. आता पुढील वर्षी निवडणूक असल्याने भीती अधिक वाढली आहे.

Web Title: Vaccination of 869 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.