कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:13+5:302021-09-21T04:18:13+5:30
कजगाव तालुका भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कजगाव, लोण,बांबरुड या ठिकाणी दोन हजार नागरिकांनी कोरोना लसीचा लाभ घेतला ...
कजगाव तालुका भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कजगाव, लोण,बांबरुड या ठिकाणी दोन हजार नागरिकांनी कोरोना लसीचा लाभ घेतला .
कजगाव आरोग्य केंद्रात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळेत झालेल्या लसीकरणाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन लसीकरणाचा लाभ घेतला. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, सरपंच पती दिनेश पाटील , नितीन सोनार यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने लसीकरण यशस्वी करण्यात आले. प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या बांबरुड येथे ४४० नागरिकांनी लोण येथे ५२० व कजगाव येथे ११०० नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घेतला. यावेळी कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. पूनम सांगवीकर,आरोग्य सेवक श्रीकांत मराठे, विकास चव्हाण, आरोग्य कर्मचारी विजय दाभाडे, वानखेडे,रोहित महाले, नलू परदेशी, सुवर्णा मोरे, कांता मोरे, सुरेखा गढरी,योगिता गढरी,ज्योती चौधरी, खरात,मोरे,राठोड,सुरेश वानखेडे,उमेश महाजन,पगारे,वाहन चालक पाटील यासह अंगणवाडी सेविका सुनंदा महाजन, अर्चना महाजन, शीतल विसपुते, मीना पगारे, विजया तिवारी, विमल महाजन, छाया महाजन, लता शिरसाठ, शारदा बोरसे यासह कजगाव,लोण,बांबरुड ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
फोटो कॅप्शन
कजगाव येथे आयोजित महा लसीकरण शिबिरात झालेली गर्दी.