लसीकरण, आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:17+5:302021-02-17T04:21:17+5:30

जळगाव : माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, जळगाव यांच्या उपक्रमांतर्गत कोविड १९ ...

Vaccination, launch of self-reliant India public awareness campaign | लसीकरण, आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेची सुरुवात

लसीकरण, आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेची सुरुवात

Next

जळगाव : माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, जळगाव यांच्या उपक्रमांतर्गत कोविड १९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि अमळनेर या तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी करण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो अमरावतीचे अंबादास यादव, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डांगर, सेवानिवृत्त प्रचार अधिकारी उल्हास कोल्हे उपस्थित होते. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे.

यावेळी दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे विनोद ढगे आणि त्यांच्या कलापथकातील कलाकारांकडून स्थानिक बोली भाषेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहोचविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी बापू पाटील, किरणकुमार आणि चमू परिश्रम घेत आहेत.

Web Title: Vaccination, launch of self-reliant India public awareness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.