११९ केंद्रांवरचे लसीकरण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:16 AM2021-04-10T04:16:08+5:302021-04-10T04:16:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविशिल्ड लसीचे डोस शिल्ल्क नसल्याने १३३ पैकी तब्बल ११९ केंद्रांवरचे लसीकरण शुक्रवारी बंद ...

Vaccination stopped at 119 centers | ११९ केंद्रांवरचे लसीकरण बंद

११९ केंद्रांवरचे लसीकरण बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविशिल्ड लसीचे डोस शिल्ल्क नसल्याने १३३ पैकी तब्बल ११९ केंद्रांवरचे लसीकरण शुक्रवारी बंद होते. तर केवळ १४ केंद्रांवर लसीकरण झाले. यात आरोग्य केंद्रांचीच संख्या अधिक आहे. दरम्यान, लसचे वाहन शुक्रवारी काही अडचणीमुळे न आल्याचे सांगण्यात आले असून ते शनिवारी सकाळी येऊन त्याच वेळी केंद्रांवर लसीचे वाटप होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यात १३३ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून लसीचा तुटवडा असल्याने ज्या केंद्रांवरची लस संपली त्या केंद्रांवरचे लसीकरणच थांबविण्यात आले आहेत. यात गेल्या चार दिवसांपासून शहरात लसीकरणच झालेले नसून दुसरा डोस असणाऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत संभ्रमाचे वातावरण आहे.

३५ हजार डोस येणार

३५ डोस आल्यानंतर शनिवारी सकाळी ७ ते ९ दरम्यान तातडीने त्यांचे केंद्रांवर वाटप होईल, असे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिल्या आहेत. १३३ केंद्रांवर समप्रमाणात वाटल्यास एका दिवसात वीस हजार डोस संपतील असे चित्र आहे. त्यामुळे हे ३५ हजार डोसचे मागणीनुसार वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार आगामी काहीच दिवस हे डोस पुरतील असेही चित्र आहे. त्यामुळे अधिकचे वितरण होणे गरजेचे आहे. प्रत्येक केंद्रावर सरासरी १५० रोज लसीकरण होत आहे. दरम्यान, लसीकरणाची गती वाढवायची असल्यास लसींचा मोठा पुरवठा होणे अत्यावश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे.

या केंद्रावरच झाले लसीकरण

उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर, रावेर उपजिल्हा रुग्णालय, रेल्वे हॉस्पिटल भुसावळ, भुसावळ रुग्णालय, भुसावळ अर्बन पीएचसी दोन, वरणगाव ग्रामीण रुग्णालय, वरणगाव पीएचसी, खासगी रुग्णालये

Web Title: Vaccination stopped at 119 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.