जळगाव जिल्ह्यात २३ केंद्रांवर लसीकरण पूर्ण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:15 AM2021-04-10T04:15:51+5:302021-04-10T04:15:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविशिल्ड लसीचे डोस संपल्यानंतर ज्या ठिकाणी कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होते अशाच केंद्रांवर लसीकरण सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविशिल्ड लसीचे डोस संपल्यानंतर ज्या ठिकाणी कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होते अशाच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. दरम्यान, शनिवारी सकाळी कोविशिल्ड लसीचे ३५ हजार डोस आल्यानंतर प्रत्येक केंद्रांवर त्यांचे वाटप होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यातील १३३ केंद्रांपैकी शहरातील सहा केंद्रांसह जिल्ह्यातील २३ केंद्रांवर पूर्णत: लसीकरण ठप्प आहे. ७७ आरोग्य केंद्र व महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील काही खासगी रुग्णालयात थोड्याफार प्रमाणात लसीकरण झाले. गेल्या तीन दिवसांपासून जळगाव शहरात तर लसीकरण झालेलेच नसून दुसऱ्या डोसबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
एकूण केंद्र १३३
लसीकरण पूर्णत: बंद असलेले केंद्र २३
लसीकरण सुरू असलेल्या केंद्रांमध्ये ७७ आरोग्य केंद्रापैकी काही आरोग्य केंद्र तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील ३४ रुग्णालयांपैकी काही रुग्णालये यामध्ये हे लसीकरण सुरू होते. शनिवारी सर्वच केंद्रांवर लस उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी सांगितले.