पारोळा येथे तीन दिवसांपासून लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:13 AM2021-07-11T04:13:42+5:302021-07-11T04:13:42+5:30
डेल्टा प्लसचा धोका वाढणार असल्याने नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. ...
Next
डेल्टा प्लसचा धोका वाढणार असल्याने नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. पण, आठवड्यात फक्त ३ ते ४ दिवसच लसीकरण सुरू असते. अजूनही शहरासह ग्रामीण भागात लसीकरण पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेले नाही.
लसीकरण जर नियमित सुरू राहिले तर लसीकरणाचा टक्का वाढेल
प्राथमिक आरोग्य केंद्रानिहाय झालेले लसीकरण
प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव - झालेले लसीकरण
पारोळा ११,०३१
मंगरूळ ३,७५४
शिरसोदे ५,३७४
तामसवाडी ४,३९४
शेळावे ४,१८१
एकूण २८,७४४