भुसावळ न्यायालयात वकील, कर्मचाऱ्यांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:11+5:302021-06-28T04:13:11+5:30

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार, न्यायालयातील कर्मचारी, वकील यांना कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस देण्यात आला. शिबिरात १६५ ...

Vaccine taken by lawyers and staff in Bhusawal court | भुसावळ न्यायालयात वकील, कर्मचाऱ्यांनी घेतली लस

भुसावळ न्यायालयात वकील, कर्मचाऱ्यांनी घेतली लस

googlenewsNext

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार, न्यायालयातील कर्मचारी, वकील यांना कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस देण्यात आला. शिबिरात १६५ जणांचे लसीकरण झाले. प्राथमिक स्वरूपात एका लाभार्थ्याला लस देऊन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा न्यायाधीश एस.बी. भंसाळी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही.जी चौखुंडे, प्रथमवर्ग न्यायाधीश के.एस. खंडारे, प्राथमिक वर्ग न्यायाधीश डी.बी. डोमाळे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.तुषार पाटील, महिला प्रतिनिधी ॲड.जास्वंदी एन. भंडारी, ॲड.दीपक पाटील, ॲड.विश्वंभर वाणी, ॲड.पुरुषोत्तम पाटील, ॲड.धनराज मगर व कर्मचारी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर व डॉ.तैसिफखान यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम यशस्वी झाली.

शिबिर यशस्वीतेसाठी राधा पाटील, सुनीता चित्ते, सुमित सपकाळे, हेमलता चौधरी, साजीद शहा, मीरा गळवे, ॲड.जास्वंदी भंडारी, पटवारी नाना, अन्सारी, तसेच कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Vaccine taken by lawyers and staff in Bhusawal court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.