आरोग्य विभागातर्फे `डेंग्यू` जनजागृती मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:26+5:302021-07-04T04:12:26+5:30

जळगाव : सध्या पावसाळा सुरू असल्याने तुंबलेल्या पाण्यामुळे व अस्वच्छतेमुळे `डेंग्यू` ची साथ पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यातील ...

विभाग Dengue Awareness Campaign by Health Department | आरोग्य विभागातर्फे `डेंग्यू` जनजागृती मोहिम

आरोग्य विभागातर्फे `डेंग्यू` जनजागृती मोहिम

Next

जळगाव : सध्या पावसाळा सुरू असल्याने तुंबलेल्या पाण्यामुळे व अस्वच्छतेमुळे `डेंग्यू` ची साथ पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यातील या साथरोगांना आळा घालण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे `डेंग्यू प्रतिरोध महिना`साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गंत नागरिकांनी डेंग्यू पासून संरक्षणसाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हाभरात जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

मनोज बाविस्कर यांची नियुक्ती

जळगाव : अखिल भारतीय युवक महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मनोज बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बाविस्कर यांची निवड करण्यात आली. यावेळी इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मानवहित लोकशाही पक्षाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव : पिंप्राळा येथे झालेल्या बैठकीत मानवहित लोकशाही पक्षाची प्रदेशाध्यक्ष राधाकृष्ण साठे यांच्या उपस्थितीत नुकतीच नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीला प्रदेश संपर्क प्रमुख अशोक बाविस्कर, खान्देश विभाग युवा अध्यक्ष विलास भालेराव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. नुतन कार्यकारिणीत महिला व पुरूषांसह १५ सदस्यांचा समावेश आहे.

किरण पाटील यांना शिवप्रेरणा पुरस्कार

जळगाव : भगीरथ इंग्लिश स्कूलचे आदर्श शिक्षक किरण पाटील यांना शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे शिवप्रेरणा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एन. ए. पाटील व महिला अध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्याहस्ते पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव : बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे समाजात वादग्रस्त विधान करुन, सामाजिक अराजकता निर्माण करत असल्यामुळे त्यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आर.पी.आय.(खरात गट) तर्फे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष जे.डी.भालेराव, सचिव प्रवीण परदेशी, महानगराध्यक्ष सिदार्थ गव्हाणे, अल्पसंख्याक युवक अध्यक्ष अजीज शेख, शहर युवक अध्यक्ष मुकेश कोचुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाबळ येथे ॲन्टीरेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन

जळगाव : पाळीव प्राण्यासाठी लस उत्पादन करणाऱ्या एका कंपनीतर्फे ६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता महाबळ येथील पशुवैद्यकीय रूग्णालयात `ॲन्टीरेबीज लसीकरण ` शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांना ॲन्टीरेबिज लस देण्याचे आवाहन कंपनीचे प्रतिनिधी सुमीत डेेरे व ज्ञानेश्वर सत्रे यांनी केले आहे.

Web Title: विभाग Dengue Awareness Campaign by Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.