वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण एक अटकेत, चार आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:15 AM2018-10-28T01:15:33+5:302018-10-28T01:21:36+5:30

गिरणा नदीच्या पात्रात वाळू माफियांनी शनिवारी सकाळी हैदोस घालत मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले तर वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण करून त्याच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लुटून नेला.

 Vaishnath police patrols arrested, four accused absconding | वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण एक अटकेत, चार आरोपी फरार

वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण एक अटकेत, चार आरोपी फरार

Next
ठळक मुद्देमहसूल प्रशासनाच्या पथकाने वाळू चोरतांना पकडलेवाळू माफियांची पुन्हा मुजोरी वाढली

धरणगाव/ खेडी कढोली ता. एरंडोल : धरणगाव तालुक्याच्या हद्दीत व वैजनाथ ता.एरंडोल (सावखेडा)गिरणा नदी पात्रातून वाळूची तस्करी करणाºया पाच वाळू माफीयांनी मंडळ अधिकाºयाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून व मारहाण करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर वैजनाथचे पोलीस पाटील यांनाही मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लुटून पलायन केल्याची घटना २७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेने जिल्ह्यात वाळूची तस्करी करणाºया वाळू माफीयांची मुजोरी पुन्हा वाढल्याचे सिध्द झाले आहे.
या प्रकाराने महसूल कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील एका आरोपीस अटक करण्यात आली असून चार आरोपी फरार झाले आहेत.
पोलीस सूत्रानुसार, वैजनाथ ता.एरंडोल येथे गट नं.१०८ च्या गिरणा नदी पात्रात धरणगाव तालुक्याच्या हद्दीत एरंडोल तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकारी मुकेश सदाशिव जाधव रा.जळगाव यांना आरोपी बंड्या विकास पाटील रा.रायसोनी नगर जळगाव, मुरलीधर आनंदा सोनवणे रा.खेडी ता.जळगाव, रवि हातोडे रा.धानोरा ता.जळगाव तसेच एम.एच.१९ एपी- ९५६१ या ट्रॅक्टरवरील ड्रायव्हर, तसेच एम.एच.१९ सीजे १७५८ वरील ड्रायव्हर हे पाच जण गिरणा नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक करतांना आढळले. त्यांना पकडून तहसिल कार्यालयात दोन्ही ट्रॅक्टर आणण्यास सांगितले असता सर्व आरोपींनी मंडळ अधिकारी मुकेश जाधव यांच्याशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केली तसेच त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या वेळी तेथे उपस्थित असलेले वैजनाथ येथील पोलीस पाटील यांनाही मारहाण करुन आरोपींनी त्यांच्या गळ्यातील चाळीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लुटून तेथून पळ काढला.
पाळधी दूरक्षेत्र पोलिसात गुन्हा दाखल
या घटने संदर्भात पाळधी दूरक्षेत्र पोलिसात मंडळ अधिकारी मुकेश जाधव यांनी पाचही आरोपीविरुध्द फिर्याद दिल्यावरून भादंवि ३०७,३९५, ३७९, ३५३, ३३२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बंड्या पाटील यास अटक करण्यात आली आहे. तर इतर चार आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगदीश मोरे हे करीत आहे.

 

Web Title:  Vaishnath police patrols arrested, four accused absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू