वसंतवाडी येथील महावितरणच्या सबस्टेशनची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:43 PM2019-09-17T22:43:47+5:302019-09-17T22:44:56+5:30
जळगाव - गावातील डीपीचा वीज पुरवठत्त सुरळीत का केला नाही? या कारणावरून वसंतवाडी येथील महावितरणच्या सबेस्टेशनमध्ये ग्रामस्थांनी खूर्ची व ...
जळगाव- गावातील डीपीचा वीज पुरवठत्त सुरळीत का केला नाही? या कारणावरून वसंतवाडी येथील महावितरणच्या सबेस्टेशनमध्ये ग्रामस्थांनी खूर्ची व टेबलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे़ याप्रकरणी वरिष्ठ यंत्र चालक राजेंद्र रमेश महाजन यांच्या फिर्यादीवरून ९ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वसंतवाडी येथील सबस्टेशनमधील इंजिनिअर अमित सुलक्षणे, विद्युत सहाय्यक विजय साळवे, संदीप गुंजकर, किशोर पवार, अशोक बारी, अमोल भगत यांच्यासह इतर कर्मचारी हे सोमवारी वीज चोरी प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी गेले होते़ त्यानंतर सबस्टेशनला परत आल्यानंतर इंजिनिअर अमित सुलक्षणे हे गावातील अधिकृत वीज घेणाऱ्या ग्रामस्थांची डीपी सुरू करण्यासाठी गेले़ त्यावेळी काही ग्रामस्थांनी त्यांना डीपी सुरू करू देण्यास विरोध केला़
सबस्टेशनमध्ये केली तोडफोड
काहीवेळानंतर संजय जगराम चव्हाण, दशरथ जगराम चव्हाण, गोपाळ बाबू राठोड, नीलेश पंडीत चव्हाण, ज्ञानेश्वर शिवा चव्हाण, सुपडू मोरसिंग चव्हाण, बसराज गणपत राठोड, विजय सिताराम चव्हाण, विक्रम भिका चव्हाण (सर्व रा़ वसंतवाडी तांडा़ता ़जळगाव) हे ग्रामस्थ वसंतवाडी येथे आले़ त्यांनी आमच्या तांड्यावर वीज पुरवठा करणारे तार काढून त्यांच्या जागी सर्वीस वायर ठाकून दुसºया नागरिकांना वीज का दिली, अशी विचारणा करित सबस्टेशनमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली़ त्यानंत खूर्च्या, टेबल तसेच फाईली फेकून नुकसान केले़ तसेच खूर्च्या व टेबल तोडून नुकसान केले़ अखेर सबस्टेशनमधील वरिष्ठ यंत्र चालक राजेंद महाजन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तोडफोड करणाºया नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़