कुसुंबा वनकक्षात वणवा

By admin | Published: April 15, 2017 12:22 AM2017-04-15T00:22:44+5:302017-04-15T00:22:44+5:30

सुमारे 200 वनमजुरांनी व तीन फायर ब्लोअरच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे सुरू असलेले प्रय} निष्फळ ठरले आहेत

Vanessa | कुसुंबा वनकक्षात वणवा

कुसुंबा वनकक्षात वणवा

Next

रावेर : पाल वन्यजीव अभयारण्यातील वनकक्ष क्र.29 मधून पेटत आलेला आगीचा वणवा रावेर वनक्षेत्रातील कुसुंबा वनकक्ष क्र. 25 व 26 मध्ये भडकला असून अग्निशमन दलाचे बंब आगीच्या भक्ष्यस्थळी पोहोचण्यास दुरापास्त ठरल्याने वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे व पाल वन्यजीव अभयारण्याचे  वनक्षेत्रपाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 वनमजुरांनी व तीन फायर ब्लोअरच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे सुरू असलेले प्रय} निष्फळ ठरले आहेत. या डिंक, लाकूड, फाटय़ासह लाखो रुपयांची वनसंपदा आगीत भस्मसात झाली असून नुकसानीचा अंदाज व्यक्त करणे तूर्तास अशक्य असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. कुसुंबा वनकक्ष क्रमांक 25 व 26 मध्ये पाल वन्यजीव अभयारण्यातील वनकक्ष क्रमांक 29 मधून आलेला वणवा भडकला   असून सातपुडय़ाच्या अतिदुर्गम भागातील आगीच्या  भक्ष्यस्थानी अग्निशमन दलाचे बंब पोहोचणे दुरापास्त ठरल्याने वनविभागाची एकच दमछाक उडाली आहे.
  वनक्षेत्रातील दोन व वन्यजीव अभयारण्यातील एक अशा तीन फायर ब्लोअरच्या साहाय्याने व 200 वनमजुरांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रय} सुरू आहेत. सायंकाळी उशिरार्पयत आग आटोक्यात आणण्यात वनविभागाला यश आले नव्हते. 

Web Title: Vanessa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.