वराडचे शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:13 AM2021-07-11T04:13:47+5:302021-07-11T04:13:47+5:30
वराड, ता. धरणगाव : गतवर्षीच्या पीक विम्याच्या रकमेपासून वराड येथील शेतकरी अद्यापही वंचित आहेत. येथील शेतकऱ्यांनी सन२०२० या ...
वराड, ता. धरणगाव : गतवर्षीच्या पीक विम्याच्या रकमेपासून वराड येथील शेतकरी अद्यापही वंचित आहेत.
येथील शेतकऱ्यांनी सन२०२० या खरीप हंगामात पीक विमा भरून व गतवर्षात सोयाबीन, मूग, उडीद व इतर पिकांचे १०० टक्के नुकसान झालेले असतानादेखील त्यांच्या हक्काचे पैसे अद्याप त्यांना मिळालेले नाहीत.
नवीन पीक विमा काढून घेण्यासाठी शासनाने अंतिम मुदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याने हवालदिल झालेले शेतकरी संजय जुलाल पवार, अनिल मोतीलाल बियाणी, आनंदसिंग नरसिंग पाटील, दिलीप ओंकार पाटील, लक्ष्मीनारायण गणपती काबरे, भिकचंद बियाणी, किशोर काबरे व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी धरणगाव यांना तक्रार अर्ज देऊन संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत, असा तक्रार अर्ज देऊन न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.