राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात वरणगावचा इसम ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:08 PM2018-12-26T22:08:46+5:302018-12-26T22:10:20+5:30
भुसावळ येथील महामार्गावर चार चाकी, मिनी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील रहिवासी असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२) जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली.
भुसावळ : येथील महामार्गावर चार चाकी, मिनी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील रहिवासी असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२) जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. याबाबत मिनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ते वीज वितरण कंपनीत जळगाव येथे सेवारत होते.
पोलीस सूत्रांनुसार, जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या मिनी ट्रक (एम.पी.०९ जी.ई.०७२९) ने मोटारसायकल (एम.एच.१९-सी.ई.७२७४) ला मागाहून जोरदार धडक दिली. यानंतर मोटारसायकल चालकाने समोरुन येणाºया चारचाकी (एम.एच.१९.एम.एच.३१३२) ला धडक दिली. यात मोटारसायकलचालक राजेंद्र श्रावण धनगर हे चारचाकीच्या खाली सापडले. यात धनगर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारसायकलचा चक्काचूर झाला. ही घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास येथील महामार्गावर नवोदय विद्यालयाच्या पुढे घडली. या अपघातात चारचाकी कारमधील एक प्रवासी जखमी झाला. त्यास गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत केली. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू असताना महामार्गाच्या कडेला खोलवर खोदाईचे कार्य सुरू आहे व यातच अपघात घडल्याने महामार्गावरील वाहनधारकांची मोठी पंचायत झाली. वाहनाच्या दुतर्फा लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. शहर पोलीस स्टेशनचे शंकर पाटीत, प्रवीण ढाके, संजय बडगुजर तसेच वाहतूक शाखेचे लतीफ पठाण, भारत काळे, भाऊसाहेब पाटील, चालक सुनील शिंदे, राजेश वणीकर यांनी वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पीएसआय के.टी. सुरळकर करीत आहे. घटनेची माहिती मिळतातच वरणगाव येथील बबलू धनगरांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.