वरणगावात पाण्यासाठी महिला धडकल्या नगरचपरिषदेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:52+5:302021-06-10T04:12:52+5:30
नगर परिषद अस्तिवात आल्यानंतर नागरिकांना २४ तास पाणी देणे बंधनकारक आहे. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भाजप सरकारच्या काळात ...
नगर परिषद अस्तिवात आल्यानंतर नागरिकांना २४ तास पाणी देणे बंधनकारक आहे. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भाजप सरकारच्या काळात पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती. मात्र तिचे काम थंडबस्त्यात आहे. दिवसेंदिवस पाणी प्रश्न बिकट होत आहे. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून नियमित पाणीपुरवठा व्हावा आणि मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू करावे, या मागण्यांसाठी नगर परिषदेवर महिलांनी मोर्चा काढला.
यावेळी मुख्यधिकारी समीर शेख, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, प्रशासन अधिकारी पंकज सूर्यवंशी, शहराध्यक्ष सुनील माळी, ए.जी. जंजाळे, संदीप भोई, मिलिंद मेढे, गोलू राणे, कृष्णा माळी, संदीप माळी, शशी चौधरी, डॉ. प्रवीण चांदने, डॉ.सादिक, डी.के. खाटीक, हितेश चौधरी, आकाश निमकर, पप्पू ठाकरे, गजानन वंजारी, योगेश माळी, सैयद जाफरअली संगीता माळी, नीता तायडे, शंकर पवार उपस्थित होते.
मागण्या मान्य न झाल्यास नगर परिषदसमोर १८ जून रोजी महिला बेमुदत उपोषण करतील.
मुख्याधिकारी आले बैठक सोडून
मुख्यधिकारी समीर शेख हे भुसावळ येथे बैठकसाठी गेले होते. परंतु मुख्याधिकारी वरणगावला आल्याशिवाय महिला नगर परिषदेमधून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वातवरण तापले होते. अखेर मुख्याधिकाऱ्यांना भुसावळातील बैठक सोडून १५ मिनिटात वरणगावला हजर व्हावे लागले. मुख्याधिकारी समीर शेख यांनी यावेळी सर्व अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.