त्रयस्थ पथकाने मतदान केंद्रांमध्ये सुचविले अनेक बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:08 PM2018-07-29T13:08:58+5:302018-07-29T13:10:36+5:30

Various changes suggested by the third party in the polling stations | त्रयस्थ पथकाने मतदान केंद्रांमध्ये सुचविले अनेक बदल

त्रयस्थ पथकाने मतदान केंद्रांमध्ये सुचविले अनेक बदल

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व माहिती आयोगाला देणारदुरूस्ती सुरू

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर शनिवारी त्रयस्थ संस्थांच्या पथकाच्या सदस्यांनी पाहणी केली. यामध्ये अनेक मतदान केंद्रावर मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी अनेक मतदान कें द्रावर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचेही सदस्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.
त्यानुसार मनपाने आवश्यक सुविधा दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर शहरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाºयांच्या त्रयस्थ समितीकडून मतदान केंद्रांची पाहणी करून, मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा घेवून, त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्याचा सूचना देखील आयोगाने दिल्या होत्या.
त्यासाठी मनपाने एक ा पथकात चार सदस्य अशा १० पथकांची नियुक्ती केली होती. तसेच शुक्रवारी याबाबत आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सर्व पदाधिकाºयांना याबाबत मार्गदर्शन देखील केले होते.
प्रश्नावलीतील सर्व माहिती आयोगाला देणार
प्रश्नावलीमध्ये सर्व सदस्यांनी दिलेली माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असून, एका दिवसातच निवडणूक आयोगाकडून याबाबत पथकातील सदस्यांनी सूचविलेल्या बदलांबाबत दखल घेवून, मतदान केंद्रांवर सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे.
अनेक मतदान केंद्रावर मनपा प्रशासनाकडून सुविधांबाबतचे काम सुरु असल्याचेही दिसून आले. तर काही मतदान केंद्राची स्थिती खूप चांगली नसल्याचेही काही सदस्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. तर काही सदस्यांनी मात्र मतदान केंद्राच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
‘लोकमत’नेही मतदान केंद्रांच्या समस्येबाबत छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन मनपाने रस्ते दुरूस्ती सुरू केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाला देणार अहवाल : ४६९ मतदान केंद्रांना भेटी
तीन तासात सर्व मतदान केंद्राची केली पाहणी
सकाळी ९ वाजेपासून मतदान केंद्रांच्या तपासणीला सुरुवात झाली. मतदान केंद्र मतदारांच्या क्षेत्रात आहे का ?, मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या अंतरात राजकीय पक्षांचे कार्यालय आहे का ? मतदारांना आत जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी स्वतंत्र दरवाजे आहेत का? अपंग बांधवांसाठी रॅम्प आहेत की नाही ? , मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठीचे रस्ते चांगले आहेत की नाही ? या प्रकारचे ५० प्रश्नांची प्रश्नावली पथकातील सर्व पदाधिकाºयांना देण्यात आली होती. त्यानुसार सुविधा-असुविधांची पडताळणी केल्यानंतर सर्व प्रश्नावली भरुन घेण्यात आली. दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील सर्व मतदान केंद्राची या पथकाव्दारे पाहणी करण्यात आली.

Web Title: Various changes suggested by the third party in the polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.