पारोळा येथे बालाजी विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 03:37 PM2019-09-09T15:37:16+5:302019-09-09T15:41:00+5:30

श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

Various competitions for Ganeshotsavan at Balaji School in Parola | पारोळा येथे बालाजी विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा

पारोळा येथे बालाजी विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा

googlenewsNext

पारोळा, जि.जळगाव : येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु.एच. करोडपती, सचिव डॉ.सचिन बडगुजर, संचालिका मंगला करोडपती, मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील उपस्थित होते.
यावेळी करोडपती यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्यातील सुप्त गुण अशा विविध स्पर्धेतून दाखवावेत व आपल्या सर्वांगीण विकास करावा असेच प्रतिपादन केले.
सचिव सचिन बडगुजर यांनी विद्यार्थ्यांमधील कलेला वाव द्यावा, असे प्रतिपादन केले. मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
या गणेशोत्सवा दरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेते असे-
फुलांच्या माळा बनवणे यात विविध इयत्तेतून प्रथम अथर्व प्रसाद वाणी, पूर्वीता शशिकांत पाटील, पवन जगदीश पाटील, चिन्मयी भूषण कासार, पराग देवीदास पारधी, सायली जिजाबराव महाजन.
रांगोळी स्पर्धेत दुसरी ते सातवीतून प्रथम, अक्षरा दत्तू बारी, चार्वी प्रवीण चौधरी, श्रावणी प्रशांत शिंपी, श्वेता दीपक सोनार, नंदिनी आनंदा महाजन, संयमी मिलिंद जैन.
चित्र रेखाटणे यात चौथी ते सातवीतून प्रथम यश हिरामण चौधरी, देवश्री महेश पाटील, रेणुका प्रमोद पाटील, प्रणव सुनील बडगुजर.
गीतगायनातून क्रिश विजय सराफ, जयश्री श्याम चव्हाण, सोनाक्षी जितेंद्र चौधरी, स्वरा किशोर चौधरी, मुग्धा विनय पाठक, कृष्णा मनोज चौधरी, धनश्री समाधान पाटील, प्रणव सुनील बडगुजर, मानसी मोहन बधान, विजय नावरकर आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. तसेच स्मरणशक्ती स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विद्यालयातील सर्व १६८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धा यशस्वीतेसाठी रेखा बडगुजर, गौरव बडगुजर व सुजित कंसारा व शिक्षकेतरांनी यांनी परिश्रम घेतले.


 

Web Title: Various competitions for Ganeshotsavan at Balaji School in Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.