जिल्हा महिला असोसिएशनतर्फे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 05:03 PM2020-02-11T17:03:00+5:302020-02-11T17:03:21+5:30
जळगाव - महिला दिनानिमित्त १ ते १५ मार्च दरम्यान जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे परिषद, स्वाक्षरी मोहीम, टू व्हीलर रॅली, ...
जळगाव- महिला दिनानिमित्त १ ते १५ मार्च दरम्यान जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे परिषद, स्वाक्षरी मोहीम, टू व्हीलर रॅली, पथनाट्य स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, व्याख्यान यांसह तपासणी शिबीर आदी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बाल्दी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी मंगला नगरकर, ज्योत्स्ना बºहाटे, मीनाक्षी वाणी, वासंती दिघे, हेमलता रोकडे आदींची उपस्थिती होती.
महिला दिनानिमित्त १ ते १५ मार्च दरम्यान कार्यक्रम होणार असून यात १ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कांताई सभागृहात महाराष्ट्र प्रदेश स्तरीय जात पंचायत विरोधी परिषद होईल. त्यानंतर ४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जी.एस. ग्राउंड येथे स्वाक्षरी मोहीम व महिला सशक्तीकरणासाठी टू व्हीलर रॅली काढण्यात येणार आहे. ६ मार्च रोजी दुपारी २ वाजेपासून काव्यरत्नावली चौकात वाढलेले बलात्कारामुळे वाढते सामाजिक ताण याविषयावर पथनाट्य तर दुपारी ३.३० वाजता समूहनृत्य स्पर्धा होईल. ८ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता काव्यरत्नावली चौकात मॅरेथॉन स्पर्धा व झुंबा नृत्य होईल. तर दुपारी ३.३० वाजता काव्यरत्नावली चौकात सायबर लॉ विषयावर व्याख्यान व विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात येईल. १५ मार्च रोजी शिरसोली येथे स्वास्थ्य परीक्षण व नि:शुल्क औषध वितरण सोहळा सकाळी १० वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमात जिल्हाभरातील महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, पत्रकार परीषदेला रत्ना झांबर, निर्मला जोशी, स्मिता पाटील कंचन भंसाली, नितू धारेवा, निता समदडीया, मिना छाजेड, हर्षा केसवाणी, ज्योती साळी, मनिषा सराफ आदी विविध महिला संघटनांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.