अमळनेरच्या अलफैज उर्दू हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:01 PM2019-12-02T15:01:18+5:302019-12-02T15:01:34+5:30
अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय एकात्मता सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
अमळनेर, जि.जळगाव : अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय एकात्मता सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात जातीय सलोखा, अहिंसा दिवस, अल्पसंख्याक कल्याण दिवस, भाषिक सुसंवाद दिवस, दुर्बल घटक व बालकामगार विरोधी दिवस, महिला दिवस आणि बालहक्क कायदाविषयक मार्गदर्शन म्हणून शाळेत कार्यक्रम पार पडला.
प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी बालहक्क कायदा, महिला सुरक्षा आणि संरक्षण आणि जातीय सलोखा याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.
प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष अनिता बाविस्कर उपस्थित होते.
रिता बाविस्कर यांनी विद्यार्थिनींना राष्ट्रीय एकात्मतेवर केलेल्या नाट्याचे कौतुक करून भावी जीवन आणि शिक्षणाविषयीची महिलांचे महत्त्व तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. उन्मेश पाटील यांनीही आपले मनोगतात विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन काही दिवसात शाळेत ग्रंथालयाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले.
समाजातील नामवंत वकील रियाज काजी यांनीही मुलींच्या शिक्षणाविषयी आणि महिला सुरक्षा कायदा याविषयी माहिती दिली. प्राचार्या आनिसा खान यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी शेख शरीफ, अबिद शेख, मुन्ना शेख अॅड.रियाज काजी मुन्ना चिकन वाले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन इब्राहिम यांनी केले.