कुºहे वनात घडले विविध प्रजातींचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 07:27 PM2020-10-09T19:27:47+5:302020-10-09T19:27:52+5:30

पर्यावरणप्रेमींचा अभ्यास दौरा : वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त अरण्यवाचन

Various species appeared in the forest | कुºहे वनात घडले विविध प्रजातींचे दर्शन

कुºहे वनात घडले विविध प्रजातींचे दर्शन

Next


भुसावळ : तालुक्यातील कुºहे पानाचे वनक्षेत्र विभाग, वन्यजीव संरक्षण संस्था आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे वन्यजीव सप्ताहनिमित्त २ ते ८ आॅक्टोबर अभ्यास दौरा करण्यात आला. कुºहे पानाचे वनखंड १२ मध्ये ४५३ हेक्टर क्षेत्रात पार पडलेल्या एकदिवशीय अरण्यवाचनात प्राणी, पशु, पक्षी, झाडी, झुडपे, वनस्पती यांच्या विविधांगी प्रजातींचे दर्शन घडले. मात्र गुळवेल वनस्पतीचे प्रमाण खूपच घटल्याचे दिसून आले.
कुºहे पानाचे वनक्षेत्राचे वनपाल प्रल्हाद महाजन, कुºहे पूर्वचे वनरक्षक संदीप चौधरी, कुºहे पश्चिमचे वनरक्षक विलास काळे, भास्कर पाटील, नरेंद्र काळे, शिवदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा पार पडला. यात वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष व सर्पमित्र सतीश कांबळे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांच्यासह सुरेंद्र चौधरी, डी. के. पाटील, संजीव पाटील, डॉ. जगदीश पाटील, सुरेंद्रसिंग पाटील, संजय ताडेकर यांचा समावेश होता.
पहाटेपासूनजामनेर रोड ते वाघूर धरणाच्या बॅक वॉटरपर्यंतच्या परिसराचे अरण्यवाचन करण्यात आले. यात जैवविविधता, गवताच्या प्रजाती, पाणवठे, वन्य प्राणी, त्याचे पाऊलठसे, पशुपक्षी, त्यांचा अधिवास, तृण, वनस्पती यांचे निरीक्षण करण्यात आले.
विविध प्रकारच्या वनस्पती
सामान्यपणे आढळलेल्या वनस्पतींमध्ये विष्णुकांत, माका, टाकळा, आवळी, पत्थरशेपु, भुईगेंद, आग्या, एकदांडी, गोधडी, झारवड, सोनकी, अर्जुन सदडा, बेहडा, साल, कडुलिंब, बकाम, सलाई, साग, आराट, बोरती, बोर, पळस, व्यांखाई, बहावा, अमलताश यांचा समावेश आहे. यासह काटेरी झुडूपवर्गीय वनस्पती मोठ्या संख्येने आढळल्या. त्यात सोंनटिकली, मेकीं, चिलार, कुर्डु, लिकस सेफॉलोटस, कुसळ, बाभूळचा प्रकार मिमोसो हमाता, ग्लोरिसा सुपरबा, कळलावी आधी प्रकार आढळून आले. गवताच्या शाहद्या , पवण्या, गोंडळी, कुसली,कुंदा,रोयश्या, अशा प्रजाती आढळल्या.
अनेक पक्ष्यांचे दर्शन
अरण्यवाचनात चंडोल, करवानक, शिक्रा, मधुबाज, लाल मुनिया, इंडीयन सिल्व्हरबिल, खाटीक, खंड्या, रंगीत तितर, तुईया, सोनपाठी सुतार, पिवळ्या कंठाची रानचिमणी, रानखाटीक, बुलबुल, चिरक, दयाळ, जांभळा शिंजीर, निखार घार आदी पक्षी दृष्टिक्षेपास आले. तसेच नीलगाय, बार्किंग डिअर, फ्यान थ्रोटेड लिझर्ड आदी प्राण्यांचेही दूरवरून दर्शन झाले. बऱ्याच ठिकाणी सुगरण पक्ष्यांचा अधिवास आढळून आला. वन्यप्राणी अधिवासाच्या असंख्य खुणाही जाणवल्या तसेच ठिकठिकाणी प्राणी, पशुपक्षी यांच्या विष्ठा आढळल्या.

Web Title: Various species appeared in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.