वरखेडीने कोरोनाला हाकलून दिले... वेशीबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:42+5:302021-05-25T04:18:42+5:30

वरखेडी, ता. पाचोरा : परिसरातील वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत आतापर्यंत ६४६ कोरोनाबाधित रूग्ण होते, त्यापैकी ५६३ उपचारानंतर बरे ...

Varkhedi kicked Corona out of the gate | वरखेडीने कोरोनाला हाकलून दिले... वेशीबाहेर

वरखेडीने कोरोनाला हाकलून दिले... वेशीबाहेर

googlenewsNext

वरखेडी, ता. पाचोरा : परिसरातील वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत आतापर्यंत ६४६ कोरोनाबाधित रूग्ण होते, त्यापैकी ५६३ उपचारानंतर बरे झाले आहेत तर ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत फक्त वरखेडी गाव सोडले तर इतर गावांमध्ये ॲक्टिव्ह रुग्ण ४५ असून, या सर्वांवर सरकारी, खासगी तसेच काहींना सौम्य लक्षणे असल्यामुळे गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू असून, वरखेडी गाव कोरोनामुक्त झाले आहे.

वरखेडी गावात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत कडक अंमलबजावणी तर केलीच; परंतु गावात वेळोवेळी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करणे, ग्रामस्थ, व्यावसायिकांना सॅनिटायझर व मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या. ग्रामस्थांनीही या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे आज वरखेडी गावात कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आली असून, ही बाब निश्चितच दिलासादायक आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, वरखेडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर पाटील, डॉ. मयूर पाटील व डॉ. दीपाली सोनवणे यांनी रुग्णांवर उपचार केले. गाव कोरोनामुक्त व्हावे, यासाठी वरखेडी सजाचे तलाठी एस. ए. चव्हाण, वरखेडी बु. व खुर्दचे पोलीसपाटील बाळू कुमावत व दगडू गोसावी हेदेखील लक्षपूर्वक कामगिरी करत आहेत. तसेच वरखेडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारीही याबाबत गंभीरता बाळगत असून, दर गुरूवारी भरणारा आठवडा बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. जेणेकरून गाव व ग्रामस्थ सुरक्षित राहतील. या सर्व प्रयत्नांमुळेच आज वरखेडी गावात आजघडीला एकही कोरोनाबाधित व्यक्ती नाही.

कोरोनाचा उपद्रव वाढू नये, यासाठी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वरखेडी बसस्थानकावर बाहेरगावचे प्रवासी, वाहनधारक, दुचाकीस्वार हे विनामास्क आढळल्यास त्यांच्याकडूनही आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंड वसूल करण्यात येत आहे. मागील आठवड्यात पाच दिवसांचा कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी फक्त मेडिकल दिवसभर उघडी होती तसेच किराणा दुकाने सकाळी ७ ते १० वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. यासाठी गावातील व्यापाऱ्यांनीही बहुमोल सहकार्य केले. आम्ही व्यापारी व ग्रामस्थांसाठी दोनवेळा कोरोना चाचणी शिबिरदेखील घेतले. त्यात फक्त दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करून गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याचे संबंधितांनी काटेकोरपणे पालन केल्याने व औषधोपचार घेतल्यामुळे प्रसार झाला नाही.

- अलका विसपुते, सरपंच

ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार, आम्ही वरखेडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दोनवेळेस ॲन्टिजन चाचणी घेतली तसेच गावात आमचे कर्मचारी वेळोवेळी सर्वेक्षण करतात. गावात बाधित रुग्ण आढळल्यास आम्ही त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करतो व घाबरून न जाता धीर देऊन १४ दिवस कोणाच्याही सहवासात न जाण्याचा सल्ला देतो. त्याप्रमाणे रुग्णांनीही आम्हाला सहकार्य केले. आज वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काही गावांमध्ये बाधित रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, याचवेळी वरखेडी गावात एकही बाधित रुग्ण नाही.

डॉ. शेखर पाटील, वैद्यकीय अधिकारी

वरखेडी ग्रामपंचायतीचे कोरोना काळातील कार्य खूपच चांगले आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन ग्रामस्थांना कोरोनाची बाधा होणार नाही, यासाठी गावात आतापर्यंत फवारणी करणे, कोरोना चाचणीचे आयोजन करणे, आठवडा बाजार बंद ठेवणे, मास्क वापरणे याची सक्ती करण्यात आली आहे. मास्क न वापरल्यास दंड करणे आदी उपाययोजना गावच्या व ग्रामस्थांच्या हितासाठी घेतले.

- नाना पंडित पाटील, ग्रामस्थ

===Photopath===

240521\24jal_8_24052021_12.jpg

===Caption===

वरखेडीने कोरोनाला हाकलून दिले...वेशीबाहेर..

Web Title: Varkhedi kicked Corona out of the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.