वर्सी महोत्सवासाठी जळगावात देशभरातील भाविक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 10:42 PM2017-10-06T22:42:02+5:302017-10-06T22:43:30+5:30
रेल्वेस्थानकावर स्वागतकक्षाची स्थापना
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 6 - पूज्य अमर शहीद संत कंवरराम साहेब यांच्या वर्सी महोत्सवासाठी भाविक जळगावात दाखल होऊ लागले असून शुक्रवारी देशातील विविध भागातून भाविक मोठय़ा संख्येने दाखल झाले. या महोत्सवासाठी येणा:या संतांचे शनिवारी आगमन होणार आहे. दरम्यान, भाविकांच्या स्वागतासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर स्वागतकक्ष उभारण्यात आला आहे.
शुक्रवारी लखनौ, वाराणसी, दिल्ली, रायपूर, छत्तीसगड येथील भाविक दाखल झाले आहेत. या सोबतच महाराष्ट्रासह देशातील विविध भागातील भाविक शनिवारी पोहचणार आहेत. सोबतच संतांचेदेखील आगमन शनिवारी रात्रीर्पयत होणार असल्याचे ट्रस्टचे अशोक मंधान यांनी सांगितले.
रेल्वेस्थानकावर स्वागतकक्षाची स्थापना
या महोत्सवासाठी येणा:या भाविक तसेच संतांच्या स्वागतासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर कक्ष उभारण्यात आला असून या ठिकाणी चहा व बिस्कीट देण्यात येऊन त्यांना सेवा मंडलर्पयत आणले जाणार आहे. मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शनिवार्पयत हे काम पूर्ण होणार आहे. शनिवारी रात्रीच मंदिर परिसर धुवून स्वच्छ करण्यात येणार आहे.
रेल्वे स्टेशन स्वागत समिती, महिला व पुरुषासाठी स्वतंत्र भोजन भंडारा समिती, सुरक्षा समिती, मंडप व्यवस्था समिती, भाविकांचा सामान सांभाळण्यासाठी समिती देखभाल समिती यांची जबाबदारी सोपविण्यात आली आह़े दागिने, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू सांभाळण्यासाठी विशेष केंद्र राहणार आहे.