जळगावात १७ आॅक्टोबरपासून वर्सी महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:41 PM2019-10-12T12:41:22+5:302019-10-12T12:41:46+5:30
जळगाव : सिंधी समाज बांधवाचे आराध्यदैवत संत कंवरराम, संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या वर्सी महोत्सवाला ...
जळगाव : सिंधी समाज बांधवाचे आराध्यदैवत संत कंवरराम, संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या वर्सी महोत्सवाला १७ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट व पूज्य पंचायत यांच्याकडून महोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून भव्य मंडप उभारणीचे काम देखील सुरू झालेले आहे़
१७ रोजी पहाटे ५ वाजता देवरी साहब यांच्या पंचामृत स्रानाने महोत्सवाला सुरूवात होईल़ त्यानंतर सायंकाळी ५ वाजता अखंड पाठ साहेब व अखंड धुनी साहेबचा शुभारंभ होणार आहे. तसेच भजनाचा कार्यक्रम होणार आहे. १९ रोजी सकाळी ११ वाजता झेंडा पूजन व सायंकाळी ५ वाजता अखंड पाठाची समाराप हाईल़ २० रोजी पूज्य वर्सी साहब यांचा पल्लव अर्थात प्रार्थना होणार आहे़
वर्सी महोत्सवानिमित्त सिंधी कॉलनी परिसरात भव्य मंडपाची उभारणी करण्यात येत आहे़ सोबतच आकर्षक रोषणाई परिसरात करण्यात येणार आहे़