खान्देशात मंगळवारपर्यंत वरुणराजाचा रुसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:51 PM2018-08-08T17:51:08+5:302018-08-08T17:54:50+5:30
मान्सून वाऱ्यांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे सरकल्याने, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार या ठिकाणी दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मंगळवार, १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडेच राहणार असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सचिन देव ।
जळगाव : मान्सून वाऱ्यांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे सरकल्याने, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार या ठिकाणी दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मंगळवार, १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडेच राहणार असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या आठवड्यापासून मान्सून वाºयांचा प्रवाह उत्तर भारताकडे सरकला असल्याने, उत्तरप्रदेश, पंजाब, हरीयाणा, बिहार, हिमाचल प्रदेशचा काही भाग या ठिकाणी वादळी वाºयासह पाऊस सुरु आहे. या मान्सून वाºयांचा प्रवाह महाराष्ट्राकडे परतण्यासाठी अनुकूल वातावरण नाही.
तसेच मान्सूनसाठी आवश्यक असलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण व्हायला, किमान आठवडा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा वेग मंदावला असून, फक्त कोकण किनारपट्टीवरच सध्या मध्यम स्वरुपाच्या हलक्या सरी अधून-मधून बरसत आहे.
ढगाळ वातावरण कायम राहणार
गेल्या दहा ते बारा दिवसापासून पावसाने दडी मारली असून, यापुढील आठवड्यातही खान्देशातील हवामान कोरडेच राहणार आहे. तसेच सकाळपासून ढगाळ वातावरणदेखील कायम राहणार आहे. शक्य झाल्यास काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीदेखील बरसण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.
मान्सून वाºयांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे असल्याने, महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस लांबला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे,नंदुरबार या जिल्हयांमध्ये १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, भागात तुरळक हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस कुठेही पडणार नाही. १४ तारखेनंतर या भागात पावसाचा जोर वाढेल. -के. एस. होसाळीकर, उपसंचालक, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई