वरुणराजचा ‘पुलशॉट’ आणि क्रिकेटर रोहित शर्माची भेट
By admin | Published: May 24, 2017 05:22 PM2017-05-24T17:22:02+5:302017-05-24T17:22:02+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माहितीसाठी अदिदास उद्योग समुहाकडून निमंत्रण
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.24- मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या आवडत्या ‘पुलशॉट आणि स्केअरकट’ या फटक्याची कृतीसह माहिती दिल्यानंतर जळगाव येथील वरणराज नन्नवरे या विद्याथ्र्याला स्वत: रोहित शर्मा याने भेट दिली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माहितीपटासाठी अदिदास उद्योग समुहाकडून निवडक चाहत्यांना ही संधी देण्यात आली होती.
देशभरातील आठ चाहत्यांची निवड
अदिदास उद्योग समुहातर्फे मुंबई इंडियन संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या देशभरातील 8 चाहत्यांची निवड करून मुंबई येथे निमंत्रित करण्यात आले होते. टिट¦र अकाऊंटवरील ‘रोहित शर्मा फॅन्स क्लब’ च्या माध्यमातून या चाहत्यांची छाननी करण्यात आली होती. या 8 चाहत्यांमध्ये विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल,जळगावचा विद्यार्थी वरूणराज राजेंद्र नन्नवरे याची निवड करण्यात आली होती.
माहितीपटासाठी वरुणराजला निमंत्रण
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभेच्छा देण्यासाठी माहितीपट तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी वरूणराज याच्यासह 8 चाहत्यांना मुंबई येथे निमंत्रित केले होते. मात्र रोहित शर्मा याच्या भेटीबाबत गोपनीयता ठेवण्यात आली होती. आयोजकांनी वरूणराज याची रोहितची पत्नी रितिका यांच्यासोबत भेट घालून दिली.
वरुणराजचा पुलशॉट आणि रोहित शर्माची भेट
त्यानंतर वरूणराज याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला हॉटेलच्या मोठय़ा हॉलमध्ये बसविण्यात आले. या ठिकाणी एक व्यक्तीने वरूणराज याला रोहित शर्मा याच्या आवडत्या फटक्यांची माहिती कृतीसह विचारली. वरूणराज याने दुस:याच क्षणी रोहित शर्माच्या ‘पुलशॉट आणि स्केअर कट’ या फटक्यांची कृतीसह माहिती दिली. त्यानंतर वरूणराजला डोळ्यावरची पट्टी काढण्यास सांगितले. प्रश्न विचारणारी व्यक्ती दुसरी कुणी नसून स्वत: रोहित शर्माच असल्याने वरूणराजने आनंदाने उडय़ा मारल्या.
रोहित शर्मा सोबत अर्धा दिवसाचा सहवास
या घटनाक्रमानंतर रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका शर्मा, वरुणराज नन्नवरे व अन्य 7 चाहते अर्धा दिवस सोबत होते. या दरम्यान चाहत्यांना शर्मा दाम्पत्यासोबत जेवण करण्याची देखील संधी मिळाली. वरूणराज हा पर्यावरण अभ्यासक राजेंद्र नन्नवरे व पर्यावरण शाळेच्या चेतना नन्नवरे यांचा सुपुत्र आहे.
श्रीश्री रविशंकर यांच्याकडून मोबाईल भेट
गेल्यावर्षी बंगलोर येथे आर्ट ऑफ लिव्हींगचे शिबिर झाले होते. या शिबिरात श्री श्री रविशंकर यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समर्पक उत्तर दिल्याबद्दल स्वत: श्रीश्री यांनी वरूणराज याला स्मार्ट फोन मोबाईल भेट दिला होता. त्यानंतर रोहित शर्मा याच्या भेटीची संधी मिळाल्याने वरूणराज याचे नातेवाईक व मित्रांकडून कौतुक होत आहे.