चाळीसगावच्या सानिका पाटीलला वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 08:40 PM2018-07-27T20:40:45+5:302018-07-27T20:41:14+5:30
लवकरच एका समारंभात होणार सन्मान
चाळीसगाव (जि. जळगाव) : माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता दहावी) भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवगार्तून नाशिक विभागातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सानिका महेंद्र पाटील हिला राज्य शासनातर्फे दिला जाणारा स्व. वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये रोख व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सानिका पाटील ही चाळीसगाव येथील डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयातून २०१८ मध्ये दहावी उत्तीर्ण झाली आहे. तिला नाशिक विभागातून सर्वाधिक म्हणजे ९८ टक्के गुण मिळाले होते. ती भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या प्रवर्गातूून प्रथम आली आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच सानिका पाटील हिला प्राप्त झाले आहे. लवकरच होणाऱ्या एका समारंभात तिला गौरविण्यात येणार आहे. सानिका पाटील ही राष्ट्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक महेंद्रसिंग पाटील व जि.प.शाळा गोंडगावच्या शिक्षिका निर्मला सोळंकी यांची कन्या आहे.