जळगावात ७ ते १० डिसेंबर दरम्यान होणार वसुंधरा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 08:22 PM2017-10-15T20:22:25+5:302017-10-15T20:23:13+5:30
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन जळगावात ७ ते १० डिसेंबर करण्यात येणार आहे. रविवारी पर्यावरण शाळा येथे घेण्यात आलेल्या संयोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय व्याघ्र परिषद व राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१५-किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन जळगावात ७ ते १० डिसेंबर करण्यात येणार आहे. रविवारी पर्यावरण शाळा येथे घेण्यात आलेल्या संयोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय व्याघ्र परिषद व राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अभय उजागरे होते. यावेळी महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे, बाळकृष्ण देवरे, वासुदेव वाढे, अर्चना उजागरे, सविता भोळे, उमेश इंगळे, चेतना नन्नवरे, अमन गुजर, वर्धमान भंडारी आदींसह जिल्ह्यातील निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक संस्थाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
नदी वाचवा,जीवन वाचवा
समर्र्पण संस्था संचलित पर्यावरण शाळा, रोटरी क्लब आॅफ ईस्ट व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन उद्योग समूह यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जात असते. यावर्षी वसुंधरा महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना ‘नदी वाचवा,जीवन वाचवा’ अशी असून यावर आधारित माहितीपट आणि उपक्रमांचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येणार आहे.
विविध स्पर्धांचे आयोजन
वसुंधरा महोत्सवानिमित्त निसर्ग संवर्धन व पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया कार्यक र्ते व संस्थांना वसुंधरा सन्मान आणि वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लघुपट, माहितीपट, निसर्ग, वन्यजीवन छायाचित्र स्पर्धा, फेस पेंटिंग स्पर्धा, पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये माहितीपटाचे सादरीकरण, व्याख्याने व चर्चासत्रांचे देखील महोत्सवादरम्यान आयोजन केले जाणार आहे.
तीन समित्यांची स्थापना
महोत्सवासाठी तीन समित्यांची स्थापना करण्यात आली असून, वसुंधरा कार्यक्रम आणि उपक्रम समितीत वासुदेव वाढे, सविता भोळे, सुरेंद्र चौधरी, मिलिंद भारंबे, भागवत कोळी यांचा समावेश आहे. व्याघ्र परिषदेत अभय उजागरे, बाळकृष्ण देवरे, अमन गजर, राहुल सोनवणे, योगेश गालफाडे हे आहेत. तर महाराष्ट राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीत राजेंद्र नन्नवरे, अर्चना उजागरे, उमेश इंगळे, इम्रान तडवी यांचा समावेश आहे. यानंतर अनेक उपसमित्यांची रचना करण्यात येणार आहे. समाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये व पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांनी या महोत्सावात सहभाग घ्यावा, असे आवाहन महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.