जळगाव : 'वायूवेग' पथकाचा धडाका ; ७ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल

By सागर दुबे | Published: April 13, 2023 04:23 PM2023-04-13T16:23:05+5:302023-04-13T16:23:21+5:30

शासनाकडून परिवहन विभागाला १७५ कोटी महसूल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

Vayuveg team rto on action mode 7 crores in fines recovered government target no papers puc | जळगाव : 'वायूवेग' पथकाचा धडाका ; ७ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल

जळगाव : 'वायूवेग' पथकाचा धडाका ; ७ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल

googlenewsNext

जळगाव : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायूवेग पथकाद्वारे सन २०२२-२३ या वर्षभरात २३ हजार १२९ वाहनांवर कारवाई करून प्रथमच ७ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ७ कोटी ३५ लाख ४० हजार इतकी दंडाची तर १ कोटी ३८ लाख रूपये इतकी थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

पीयूसी नाही, मग दंड तर होईलच...
वायूवेग पथकामार्फत सन २०२२-२३ या वर्षात लायसन्स नसणारे २१३५, परवाना नसलेले ३९४, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या ३५५८, पीयूसी नसलेल्या २९९९, अवैध प्रवासी वाहतूक करणारे ३९४, अवैध प्रवासी वाहतूक करणा-या बसेस १६५ तर हेल्मेट परिधान न करणारे ४४७१, सीटबेल्ट न लावणारे ११२५, वाहन चालविताना मोबाईल वापरणारे ७२२, वाहनाचा विमा नसणारे ३३३५, वेगाने वाहन चालिवणारे ११९२, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणा-या १७० वाहन तर क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणारे ८७८ वाहनांवर तर लाल परावर्तक नसणा-या २२८० व टपावरून मालाची वाहतूक करणाऱ्या ९३ लक्झरी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. यांच्याकडून दंड वसूर करण्यात आला आहे.

९२ टक्के उद्दिष्ट पूर्ण...
शासनाकडून परिवहन विभागाला १७५ कोटी महसूल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी परिवहन विभागाने सन २०२२-२३ या दरम्यानात एकूण १६० कोटी ९८ लाख रूपयांचा महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याची टक्केवारी ९२ टक्के इतकी आहे.

कार नोंदणीमध्ये घट
सन २०२२-२३ या वर्षात परिवहन कार्यालयात एकूण ५६ हजार ३२३ इतक्या नवीन वाहनांची नोंदणी झालेली असून मागील वर्षीच्या तुलनेत नवीन दुचाकी वाहनांच्या नोंदणीत १० टक्कयांनी वाढ झालेली आहे. तर नवीन हलके मोटार वाहन (कार) च्या नोंदणीमध्ये ६ टक्क्यांनी घट झाली आहे.

इलेक्ट्रीक वाहन सुसाट...
वाहनांच्या नोंदणीमध्ये मुख्यत: इलेक्ट्रीक वाहनांच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मागील वर्षी नवीन २६ नवीन इलेक्ट्रीक कारची नोंदणी होवून त्या रस्त्यावर उतरल्या असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

परिवहन कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच सात कोटींपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई वायूवेग पथकामार्फत करण्यात आली असून महसुली वसुलीचे उद्दिष्ट देखील ९२ टक्के पूर्ण झाले आहेत.
श्याम लोही
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Vayuveg team rto on action mode 7 crores in fines recovered government target no papers puc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.