राष्ट्रपुरूषांसह भाजीपाल्यांची साकारली वेशभूषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 08:43 PM2019-11-23T20:43:55+5:302019-11-23T20:44:30+5:30
फॅन्सी ड्रेस : चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केली धमाल
जळगाव- विवेकानंद प्रतिष्ठान संचलित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिनानिमित्त राष्ट्रपुरषांसह विविध पालेभाज्यांची वेशभूषा साकारून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भाषण केली़
यावेळी विद्यार्थ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यामध्ये भेंडी, टमाटर, वांगे, मिरची, भोपळा आदींची वेशभूषा साकारली होती़ त्यानंतर त्या-त्या पालेभाज्या व फळभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांनी दिली़ हा कार्यक्रम गुरूवारी पार पडला़ दरम्यान, शुक्रवारी ज्यू. के. जी. च्या विद्यार्थ्यांनी बालदिनानिमित्त विविध नेत्यांची वेशभूषा केलेली होती. या विद्यार्थ्यांनी नेत्यांची घोषवाक्ये म्हणून दाखविली. पं. नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, वीर सावरकर अशा विविध रुपात चिमुकल्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला़ दरम्यान, विद्यार्थ्यांना साकारलेल्या वेशभूषासोबत सेल्फी काढण्याचा मोह देखील पालकांना आवरता आला नाही़ यावेळी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वैशाली चौधरी व योगिता पाटील यांनी केले. तर कार्यक्रमासाठी स्मिता पाटील व रुपाली देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, सविता कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले़