जळगावात आवक वाढल्याने पालेभाज्यांचे भाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:58 AM2018-12-21T11:58:10+5:302018-12-21T11:59:22+5:30
भाजीपाला : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याचे दर वगळता सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर
जळगावात वाढत्या थंडीबरोबरच भाज्यांची आवक वाढत आहे. परिणामी, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याचे दर वगळता सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर असून, इतर पालेभाज्यांची आवक दररोज चांगली होत आहे.
मागणी वाढल्याने वाग्यांच्या दरात क्विटंलमागे २०० रुपयांपर्यंत वाढ झाली असून, क्विंटलला ६०० ते ११०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कोथिंबिरीला १ हजार ते १८०० रुपये दर मिळाला, तर मेथीला ७०० ते १५०० रुपयांपर्यंत दर होता. या आठवड्यातही मेथीचा दर स्थिर राहिला. तसेच पंधरा दिवसांपासून मागणी वाढली नसल्याने वटाणा, पालक, भोपळा, गवार यांचे दर या आठवड्यांतही ‘जैसे थे’ होते. पांढºया कांद्याला या आठवड्यांत ६०० ते ८७५ रुपयांपर्यंत दर मिळाला. तसेच लाल कांद्याला मागील आठवड्यांत २५० ते ७०० रुपये दर मिळाला. बटाट्याला ३२५ रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.