अवैधरित्या मद्यसाठा घेऊन जाणारे वाहन पकडले
By admin | Published: April 23, 2017 06:25 PM2017-04-23T18:25:39+5:302017-04-23T18:25:39+5:30
दोघांना शिरपूर पोलिसांनी तालुक्यातील निमझरी गावाजवळ रंगेहात पकडले.
ऑनलाइन लोकमत
शिरपूर, जि. धुळे, दि. 22 - मध्यप्रदेशातून बेकायदेशीर दारू घेऊन पाचो:याकडे (जि. जळगाव) जाणा:या दोघांना शिरपूर पोलिसांनी तालुक्यातील निमझरी गावाजवळ रंगेहात पकडले. या कारवाईत त्यांच्याकडे असलेल्या गाडीसह 2 लाख 80 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातून बेकायदेशीर दारू एका गाडीतून (क्रमांक एम़एच़20-9586) घेऊन जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांनी मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाघ, मुकेश गुजर, अखिल पठाण यांच्या पथकाने सापळा रचून निमझरी गावाजवळ ही गाडी पकडली़ गाडीत 80 हजार 400 रूपये किंमतीची बॉम्बे स्पेशल व्हिस्कीच्या 240 बाटल्या सापडल्या. हा माल पाचोरा (जि. जळगाव) येथे नेला जात असल्याची माहिती गाडीतील अनिल कडू वाडले, रा़पाचोरा व नितीन सिध्दार्थ सोनवणे रा़वरखेडा ता़पाचोरा यांनी दिली़
या कारवाईत 2 लाखाची गाडी व 80 हजार 400 रूपयांची दारू असा एकूण 2 लाख 80 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आह़े याप्रकरणी अनिल व नितीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.