जळगाव आरटीओ कार्यालयात वाहन हस्तांतर आता आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:48 PM2018-02-22T22:48:49+5:302018-02-22T22:50:34+5:30
वाहन हस्तांतरणाची नोंद, मयत व्यक्तीच्या नावावरील वाहन हस्तांतरणाची नोंद, नाहरकत प्रमाणपत्र यासह आरटीओच्या तब्बल १६ सेवा १ मार्चपासून आॅनलाईन होणार आहेत. या सेवांचे शुल्क व कर आॅनलाईनच भरले जाणार आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी आपोआप कमी होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २२ : वाहन हस्तांतरणाची नोंद, मयत व्यक्तीच्या नावावरील वाहन हस्तांतरणाची नोंद, नाहरकत प्रमाणपत्र यासह आरटीओच्या तब्बल १६ सेवा १ मार्चपासून आॅनलाईन होणार आहेत. या सेवांचे शुल्क व कर आॅनलाईनच भरले जाणार आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी आपोआप कमी होणार आहे.
या सेवा होणार आॅनलाईन
वाहन हस्तांतरण नोंद, मयत व्यक्तीच्या नावावरील वाहन हस्तांतरण नोंद, लिलाव प्रक्रियेत विक्री करण्यात येणाºया वाहनांची नोंद, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल, वाहनावरील कर्जबोझा नोंदविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे, वाहनास ना हरकत प्रमाणपत्र देणे, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहनात बदल केल्याची नोंद, योग्यता प्रमाणपत्राची दुय्यम प्रत जारी करणे, वाहनाच्या प्रकारात बदल करणे, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे, नवीन व्यवसाय प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे व अनुज्ञप्तीविषयक शुल्क भरणा इ.
हे शुल्क व दंड कार्यालयात भरावे लागणार
पर्यावरण कर, व्यवसाय कर, खटला विषयक कामकाज, अन्य कार्यालयातून तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र घेवून येणाºया वाहनांचे कामकाज, परवाना विषयक कामकाज, पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क व पोस्ट बटवड्याचे परत आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे शुल्क इ.
कोट..
कामाचा जलदगतीने निपटारा व नागरिकांना त्रास कमी व्हावा यासाठी आरटीओचे कामकाज आॅनलाईन केले जात आहे. कार्यालयात आलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी जनसंपर्क अधिकाºयाचीही नियुक्ती केली जाणार आहे. १ मार्चपासून त्याची अंमलबजावणी होईल.
-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी