मुलीच्या शाळेतून स्रेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या आईचा महामार्गाने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 01:23 PM2020-02-09T13:23:53+5:302020-02-09T13:24:27+5:30

पतीसह मुलगी आणि भाचा जखमी ; वाहतूक ठप्प

The victim returned to the highway after completing an assembly from her daughter's school | मुलीच्या शाळेतून स्रेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या आईचा महामार्गाने घेतला बळी

मुलीच्या शाळेतून स्रेहसंमेलन आटोपून घरी परतणाऱ्या आईचा महामार्गाने घेतला बळी

Next

जळगाव : पाळधी येथील इम्पेरियल स्कूलमधील स्रेहसंमेलन आटोपून मुलगी व भाच्यासह घरी परतणाºया दाम्पत्याच्या दुचाकीला मागून भरधाव येणाºया वाहनाने जोरदार धडक दिली़ यात महिला दुचाकीवरून खाली कोसळली आणि त्याचवेळी धडक देणारे वाहन अंगावरून गेल्याने महिला जागीच ठार झाली. अंगावर शहारे आणणारी ही घटना महामार्गावरील वाटीकाश्रमाजवळ सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास घडली़
गायत्री समाधान पाटील (२७, रा़ वाणी गल्ली, पिंप्राळा) असे मृत महिलेच नाव आहे़ तर समाधान पाटील, परी पाटील व रिदम असे तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़ पिंप्राळा येथील वाणी गल्लीमध्ये समाधान पाटील हे वास्तव्यास आहे़ कॉम्प्युटरीची कामे करून ते घराचा उदरनिर्वाह करतात़ मुलगी परी ही पाळधी येथील इम्पेरियल स्कूलमध्ये सिनीअर के़जी़मध्ये शिक्षण घेत आहे़
मागून दिली जोरदार धडक
खोटेनगर परिसरातील वाटीकाश्रमसमोरील महामार्गावरून जात असताना मागून भरधाव आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ धडक एवढी जबर होती की, गायत्री या दुचाकीच्या खाली कोसळल्या आणि धडक देणारे वाहन त्यांच्या अंगावरून गेले़ त्यामुळे गायत्री ह्या जागीच ठार झाल्या तर समाधान, परी आणि रिदम हे तिघे जखमी झाले़
जखमींना रूग्णालात हलविले... अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. तर दुसरीकडे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती़ अपघात झाल्याचे कळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दखल केले तर मृत महिलेस जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते़ तर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़ जखमी समाधान यांच्या पायाला तसेच हाताला व त्यांचा रिदम याच्या देखील पायाला दुखापत झाली आहे. दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Web Title: The victim returned to the highway after completing an assembly from her daughter's school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव