जिल्ह्यातील २०१६ नागरिक कोरोनाचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:18 AM2021-04-23T04:18:03+5:302021-04-23T04:18:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गुरूवारी १८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ही २०१६ नोंदविली गेली आहे. दुसऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गुरूवारी १८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ही २०१६ नोंदविली गेली आहे. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. दरम्यान, जळगाव शहरातील मृत्यू थांबत नसून गुरूवारी पुन्हा ६ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुसरीकडे १७५ नवे रुग्ण आढळून आले असून २२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
जळगाव शहरातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसरीकडे मृत्यू मात्र, थांबतच नसल्याचे गंभीर चित्र आहे. गुरूवारी २७ वर्षीय तरूणासह सहा बाधितांचा मृत्यू झाला. यासह धरणगाव, एरंडोल, रावेर, चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी २ तर भडगाव, पारोळा, जामनेर, भुसावळ या तालुक्यात प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे.
गुरूवारी झालेल्या चाचण्या
ॲन्टीजन : ८६२८, बाधित : ७७९, पॉझिटिव्हिटी : ९.०२ टक्के
आरटीपीसीआर आलेले अहवाल : २०५४, बाधित : २५५, पॉझिटिव्हिटी : १२. ४१ टक्के
असे झाले आहेत मृत्यू
२ एप्रिल पहिला मृत्यू
२ जून १०० मृत्यू
३० जुलै ५०० मृत्य
१५ सप्टेंबर १००० मृत्यू
२२ मार्च १५००
२२ एप्रिल २०००
महिनाभरात ५०३ मृत्यू
गेल्या महिनाभराच्या कालावधीत म्हणजेच २२ मार्च ते २२ एप्रिल या कालावधीत ५०३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतची तीस दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी असून पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेत मृत्यू अधिक होत असल्याचे गंभीर चित्र आहे. त्यातच सारी या आजाराच्या रुग्णांचेही मृत्यू झाले आहे. सरासरी दहा पेक्षा अधिक मृत्यू रोज नोंदविले जात आहेत.