भुसावळात माय-लेकी ठरल्या कौटुंबिक कलहाच्या बळी
By admin | Published: April 18, 2017 01:17 PM2017-04-18T13:17:57+5:302017-04-18T13:17:57+5:30
पत्नीने उधारीत साडय़ा आणल्याचा राग आल्याने पती-पत्नीत जोरदार खटके उडाले अन् संतापातच पत्नीने पोटच्या दोन्ही गोळ्यांसह आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल़े
Next
भुसावळ,दि.18- पत्नीने उधारीत साडय़ा आणल्याचा राग आल्याने पती-पत्नीत जोरदार खटके उडाले अन् संतापातच पत्नीने पोटच्या दोन्ही गोळ्यांसह आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल़े दैव बलवत्तर म्हणून साडेतीन वर्षाची चिमुरडी बचावली मात्र दोन्ही माय-लेकी कौटुंबिक कलहाच्या बळी ठरल्या़
शहरातील जळगाव रोडवरील भिरूड कॉलनीत गवळे कुटुंब वास्तव्यास आहेत़ लक्ष्मण सुरेश गवळे हे वरच्या मजल्यावर तर लहान बंधू राजेंद्र गवळे हे खालच्या मजल्यावर राहतात़ लक्ष्मण गवळे यांचे पत्नी मनीषाशी रविवारी सकाळी उधारीत आणलेल्या साडय़ांवरून घरात कौटुंबिक वाद झाला अन् पत्नीने टोकाचे पाऊल उचलत दोन्ही मुलींसह रेल्वेखाली झोकून दिल़े रविवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असलीतरी रात्री 12 वाजेच्या सुमारास ती उघडकीस आली़
तिसरी मुलगी बचावली
गवंडी काम करणा:या लक्ष्मण गवळे यांना दिव्या (18), पायल (15) व प्राची (3़5) अशा तीन मुली आहेत़ दोन नंबरची मुलगी पायल (15) ही आत्याकडे काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे गेल्याने कालच्या दुर्दैवी घटनेतून ती बचावली़
आडगावात शोककळा
आदर्श गाव आडगाव (ता़चोपडा) येथील मयत मनीषा गवळे यांचे माहेर तर एकनाथ नारायण सूर्यवंशी यांच्या त्या धाकटय़ा कन्या़ सूर्यवंशी यांना तीन कन्या आहेत़ त्यातील थोरली अक्का, दोन नंबरची राधा व धाकटी मनीषाचा साधारण 22 वर्षापूर्वी लक्ष्मण गवळे यांच्याशी विवाह झाला होता़ माय-लेकींनी रेल्वेखाली झोकून केलेल्या आत्महत्येनंतर आडगावातही शोककळा पसरली़
एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा
रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या मनीषा गवळे व दिव्या गवळे यांच्या मृतदेहावर जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी भिरूड कॉलनीतील निवासस्थानी आणण्यात आला़ एकाचवेळी माय-लेकींच्या निघालेल्या अंत्ययात्रा पाहून उपस्थित नातेवाईकांसह कॉलनी भागातील महिलांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होत़े