शिक्षा भोगून आलेल्यास ग्रामस्थांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 12:13 PM2017-05-16T12:13:07+5:302017-05-16T12:13:07+5:30
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चहार्डी येथील 25 ते 30 जणांविरूद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
चोपडा, जि. जळगाव, दि. 16 - खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या इसमाला मारहाण करीत त्याला दोराने बांधून चोपडा शहर पोलीस स्टेशनला आणले. तसेच पोलीस स्टेशनच्या आवारात आरडाओरड करून, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चहार्डी येथील 25 ते 30 जणांविरूद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेला गुलाब हिरालाल धोबी याने 15 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गावात दगडफेक केली. त्यास ग्रामस्थांनी समजावून सांगितले तरी त्याने ऐकले नाही. म्हणून ग्रामस्थांनी त्यास मारहाण केली व दोराने बांधून चोपडा शहर पोलीस स्टेशनला आणले. पोलीस स्टेशनच्या आवारात गर्दी जमवून आरडा ओरड केली. पोलीस स्टेशनच्या आवारातून गुलाब धोबी यास परस्पर घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना अडविले. ग्रामस्थांनी शासकीय कामात अडथडा निर्माण करीत जिल्हाधिका:यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार श्यामराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळशीराम धनगर कोळी, राजेंद्र दुलीचंद चावर, मधुकर नामदेव कोळी, सीताराम वसंत पाटील, गिरीश सुभाष पाटील, नरेंद्र युवराज पाटील, किशोर शांताराम कोळी, गोपाळ धनराज कोळी, प्रवीण दिलावर पिंजारी, अजरुन देवराम कोळी, पंकज देवराम कोळी, संदीप प्रताप मोरे, किरण विश्वनाथ चौधरी, संदीप दत्तात्रय पाटील, शरद शांताराम कोळी , विजय सुकदेव कोळी, मिलिंद सुभाष शेट, भाईदास सैंदाणे यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.